मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांवर काही बोलतील असे मला वाटत नाही. कारण गेल्या 3 महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जितके जीआर काढायचे होते, तेवढे काढण्यात आले आहेत. काही विभागांत हे जीआर पोहोचलेले नाहीत किंवा ग्रामीण पातळीवर तफावत राहिली आहे,
.
आमदार प्रसाद लाड म्हणाले, सध्या सणासुदीचे दिवस असून मुंबईत गणेशोत्सव आणि दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये, असे आमचे आवाहन होते. आमच्या विनंतीचा मान ठेवत त्यांनी मुंबईत न येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मुख्यमंत्री 100 टक्के पूर्ण करतील. तर सदावर्ते माझे मित्र आहेत, ते असे का करत आहेत याची कल्पना नाही, पण मी त्यांच्याशी नक्की बोलेन.

महापौरांची बदनामी थांबवावी
प्रसाद लाड म्हणाले की, ज्या पत्रामुळे इतकी चर्चा रंगली, ते पत्र रितू तावडे यांच्या कार्यालयातून गेलेच नव्हते. या प्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. महापौर ही केवळ एक व्यक्ती नसून 150 वर्षांचा इतिहास असलेली एक संस्था आहे. महापौरांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान आहे आणि जनसंपर्क विभागाकडून होणारी बदनामी थांबली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वृत्त वाचा हे सरकार मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे करतंय:जरांगे पाटलांचा संताप, थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत असून, उद्यापासून अंतरवाली सराटी येथे निर्णायक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले, मात्र अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारले नाहीत किंवा नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिले नाही, अशा सर्व मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘अर्ज घेतला नाही, तर अंतरवालीत या’
सरकारकडून मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले नसल्याचे सांगितले जात असल्याचा उल्लेख करत जरांगे पाटील म्हणाले की, ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी पुढे यावे. तसेच ज्यांनी अर्ज घेऊन कार्यालयात गेले, मात्र अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नाही, अशा बांधवांनीही अंतरवालीत यावे. आज दिवसभर आणि रात्रभर अंतरवालीत येण्याचे आवाहन त्यांनी केले. वाचा सविस्तर
