Organized by Shri Deshmukh Maharaj Foundation on the occasion of Gangadhar Swami Samadhi ceremony | देशी गाईंवरील पुस्तकांचे प्रकाशन: श्री देशमुख महाराज फाऊंडेशनतर्फे गंगाधर स्वामी समाधी सोहळ्यानिमित्त आयोजन – Pune News



श्री देशमुख महाराज फाऊंडेशनने देशी गायींवरील विविध पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून जागतिक विक्रम नोंदवला आहे. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याची नोंद करण्यात आली. ‘गौ-कथा सप्ताह’ अंतर्गत ‘भारतीय कामधेनू’ हे पुस्तक सभागृहात उपस्थित सर्व गो-भक्तांच

.

हा उपक्रम श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करणे आणि भारतीय सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपण्याचा या सप्ताहाचा उद्देश होता. पुण्यात प्रथमच वर्धमान सभागृह, गंगाधाम चौक येथे हा गौ-कथा सप्ताह आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास देशमुख महाराज, अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे, विश्वस्त नरहर शिदोरे, वेदमुर्ती मंदार खळदकर, भोला वांजळे, डॉ. प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रसाद खंडागळे यांचा देशी गायींवरील संशोधनातील समर्पण आणि मानवकल्याणासाठीच्या योगदानाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वतीने गौरव करण्यात आला.

गुरुदास देशमुख महाराज यांनी सांगितले की, जुन्या पिढीला गायीचे महत्त्व माहीत आहे, परंतु नव्या पिढीलाही ते कळावे यासाठी संस्थेने देशी गायींचे महत्त्व सांगणाऱ्या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. ही पुस्तके संस्थेतर्फे हजारो शाळांमध्ये वाटप केली जाणार आहेत. देशी गायींची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्था प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. प्रसाद खंडागळे म्हणाले, पंचगव्य हे शुद्धीकरण, आयुर्वेदीय उपचार, पूजाविधी तसेच काही पारंपरिक औषधांमध्ये वापरले जाते. आज देशी गायींवर, म्हणजेच पंचगव्यावर अनेक संशोधन होत आहेत. त्याद्वारे विविध आजार बरे करण्याचे तसेच विविध औषधांची निर्मिती केली जात आहे. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *