Mumbai BMC Election Controversy; BJP Leader K Annamalai Challenges Thackeray Brothers | मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा: भाजप नेते अन्नामलाईंचे ठाकरे बंधूंना आव्हान; मला धमकावणारे राज ठाकरे कोण? असा सवाल – Maharashtra News



मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई महाराष्ट्राची नसल्याचे विधान करून भाजपची अडचण करणाऱ्या के अन्नामलाई यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबई महाराष्ट्रापुरते मर्यादित शहर नाही. ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण त्

.

मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून प्रचाराला लागलेत. त्यातच तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के अन्नामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान करून भाजपची अडचण केली आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा या मुद्याला हात घालत एकप्रकारे आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचाच दावा केला आहे. एवढेच नाही तर मी मुंबईला येतोय, माझे पाय तोडून दाखवा, असे आव्हानही त्यांनी ठाकरे बंधूंना दिले आहे.

मला धमकावणारे राज ठाकरे कोण?

के अन्नामलाई आज सकाळी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, मला धमकी देणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलावली होती. मलाही माहिती नव्हते की, मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असे लिहिले आहे की, मी मुंबईत आल्यानंतर माझे पाय छाटले जातील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येतो. माझे पाय छाटण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा.

मी धमक्यांना घाबरणारा असतो, तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की, कामराज हे भारताच्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो की, ते तामिळ राहिले नाहीत. त्यानुसारच जर मी म्हणालो की, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, तर त्याचा अर्थ असा होतो का की, महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही? हे सर्व अज्ञानी लोक आहेत, असे ते म्हणालेत.

आत्ता पाहू मुंबईविषयी काय म्हणाले होते अन्नामलाई?

भाजप नेते अन्नामलाई गत आठवड्यात मुंबईत भाजपच्या प्रचाराला आले होते. तिथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते, मुंबईतील लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. मुंबई हे देशातील एकमेव असे शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातील शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट 75 हजार कोटी आहे. ही लहान रक्कम नाही. चेन्नईचे बजेट 8 हजार कोटी आहे. बंगळुरूचे बजेट 19 हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *