![]()
छत्रपती संभाजीनगरातील नारळीबाग भागात घर रिकामे करण्याच्या कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाने आणि भावजयीने मिळून दोन पाळीव कुत्र्यांची शस्त्राने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात सख्खा भाऊ आणि भावजयीवर प्राणीछळ प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारळीबाग येथील आरती किराणा स्टोअरच्या मागे राहणाऱ्या 65 वर्षांच्या कौशल्याबाई गंगाधर लोखंडे यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. लोखंडे कुटुंबाने 2.5 महिन्यांचा काळ्या रंगाचा रॉकी आणि 3.5 महिन्यांची पांढऱ्या रंगाची ब्यूटी अशी दोन कुत्री पाळली होती. त्यांना त्यांच्या तीन मजली इमारतीच्या छतावर ठेवले जायचे. याच इमारतीत 4 खोल्यांमध्ये कौशल्याबाईंचा सख्खा भाऊ शामराव शेलार आणि भावजयी रुखमनबाई शामराव शेलार हे गेल्या 15 वर्षांपासून विनामूल्य राहतात. कौशल्याबाईंनी त्यांना घर रिकामे करण्यास सांगितल्याने त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. “पाळीव कुत्रे छतावर घाण करतात, त्यांचा त्रास होतो, त्यांना एके दिवशी मारून टाकू,” अशी धमकी आरोपींनी इतर भाडेकरूंकडे दिली होती. 25 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता छतावर सुखरूप बांधलेल्या या दोन्ही कुत्र्यांना, 26 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजता कुणीतरी शस्त्राने मारून टाकल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिस हवालदार राजेश शिंदे अधिक तपास करत आहेत. गुन्ह्याचे स्वरूप आणि कायदेशीर शिक्षा
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार:घर रिकामे करण्याच्या वादातून 2 पाळीव कुत्र्यांची शस्त्राने हत्या, सख्खा भाऊ अन् भावजयीवर गुन्हा
Previous ArticleAmaal Mallik Announces Break From Music Industry
