![]()
सन २०२५ हे वर्ष वैजापूर तालुक्याच्याइतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेजाणारे ठरले आहे. तब्बल तीनदशकांपासून डोक्यावर असलेलेकर्जाचे ओझे अखेर उतरले आणिरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचनयोजनेतील १४ गावांतील शेतकऱ्यांनाखऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. २६मार्च
.
या योजनेपोटी तालुक्यातील १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या डोक्यावर तब्बल २१० कोटी रुपयांचे कर्ज होते. सुरुवातीला जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांच्या सातबारावर ३४ कोटीरुपये कर्ज घेऊन योजना सुरू झाली.मात्र जायकवाडी धरणासाठी पाणीसाठा आरक्षित करणे, ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचारामुळे ही योजना बंद पडली आणि शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकले. राज्यशासनाने १८ जून २०२४ रोजी योजनेच्या थकीत मुद्दल रकमेची म्हणजेच ६४ कोटी २६ लाख ५९हजार रुपयांची कर्जमाफी जाहीरकेली. मात्र व्याजाचा डोंगर कायमहोता. अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेत १६ जुलै२०२४ रोजी १४५ कोटी २७ लाखरुपयांची कर्जमाफी मंजूर केली.नागपूर हिवाळी अधिवेशनात निधीची घोषणा झाल्यानंतर २०२५ मध्ये प्रत्यक्ष धनादेश सुपूर्द झाला आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्याचा मार्ग मोकळा झाला. ही कर्जमाफी केवळ आर्थिक निर्णय नसून वैजापूरच्या शेतकऱ्यांच्या संयम, संघर्ष आणि न्यायाच्या लढ्याला मिळालेली ऐतिहासिक पावती ठरली.
लाभार्थी गावे महालगाव, भगूर,पानवी, टेंभी, सिरसगाव, बल्लाळीसागज, एकोडीसागज, खिर्डी, माळीसागज, कनकसागज, टाकळीसागज, गोळवाडी, पालखेड, दहेगाव या गावांतीलशेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले.
नॉलेज: १९९१-९२ मधील योजना
रामकृष्ण गोदावरी योजनेची स्थापना १९९१-९२ मध्ये झाली. एकूण २,११७ शेतकऱ्यांकडे सुमारे व्याजासह २१० कोटींचे कर्ज होते. यात शासनाकडूनमुद्दल माफी ६४.२६ कोटी रुपये होती. जिल्हा बँकेकडून कर्जमाफी १४५.२७ कोटींची झाली. १९९५ मध्येजायकवाडीचे पाणी आरक्षण पडले.या वेळी ढिसाळ नियोजन व भ्रष्टाचारामुळे योजना बंद झाली.
