![]()
बदलापूरमधील खरवई एमआयडीसी परिसरात आज भीषण स्फोटांची मालिका घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील ‘पॅसिफिक केमिकल’ कंपनीत एकापाठोपाठ एक सुमारे 8 ते 10 भीषण स्फोट झाले असून, त्यानंतर परिसरात आगीचे प्रचंड लोट पसरले आहेत. ही आग इतकी रौद्र स्वरूपाची आहे की,
.
बदलापूरच्या खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, अर्ध्या तासाच्या अंतरात सुमारे 8 ते 10 स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की, आगीचे लोळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
पॅसिफिक केमिकल कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या भीषण स्फोटांनी अवघ्या काही वेळातच रौद्र रूप धारण केले असून, या आगीची झळ शेजारील दोन कंपन्यांनाही बसली आहे. स्फोटांच्या तीव्रतेमुळे परिसरात धुराचे काळे लोट पसरले असून दोन्ही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी तैनात असून, आग अधिक पसरू नये यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, या स्फोटात कंपनीतील केमिकलचे आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
