मुंबईत ‘वंचित बहुजन आघाडी’मुळे काँग्रेससमोर मोठा पेच: आता बंडखोरांना पाठिंबा देण्याची नामुष्की, नेमके काय घडले? – Mumbai News

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. यंदा भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युती टिकवण्यासाठी मोठ

.

मुंबईत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडून 62 जागा मागून घेतल्या. मात्र, मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितने 62 जागांच्या कोट्यापैकी केवळ 46 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. उर्वरित 16 जागांवर पक्षाला उमेदवारच मिळाले नसल्याची चर्चा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे उमेदवार नाहीत याची पुसटशी कल्पनाही वंचितने काँग्रेसला दिली नाही. जर काँग्रेसला वेळीच माहिती मिळाली असती, तर त्यांनी त्या 16 जागांवर आपले प्रबळ उमेदवार उभे केले असते. मात्र, मुदत संपल्यानंतर ही बाब समोर आल्याने काँग्रेसला आता तिथे ‘एबी’ फॉर्म देता येणे अशक्य झाले.

आता बंडखोरांना पाठिंबा देण्याची नामुष्की

ज्या 16 जागांवर वंचितने उमेदवार दिलेले नाहीत, त्यातील अनेक प्रभागांत काँग्रेसची ताकद चांगली आहे. युतीमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे मन करत, या जागा वंचितला सोडल्या होत्या. आता या जागांवर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्याने, पक्षाला तिथे बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिलेल्या स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाच पाठिंबा देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाईल. मुंबईत वंचितने दिलेल्या या अनपेक्षित धक्क्यामुळे काँग्रेसच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत असून, आगामी प्रचाराच्या काळात या युतीचे भवितव्य काय असेल? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

1999 नंतर काँग्रेसचा सर्वाधिक जागांवर लढणार

जागावाटपातील हा गोंधळ सोडला तर, काँग्रेसने यंदा राज्यात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस महापालिका निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वबळावर आणि आघाडी करून मैदानात उतरली आहे.

काँग्रेस कोणत्या शहरात किती जागा लढवत आहे?

  • मुंबई – 167
  • ठाणे – 101
  • पुणे – 100
  • पिंपरी चिंचवड – 60
  • छत्रपती संभाजी नगर – 100

काँग्रेसचा स्वबळाचा नारा कोणत्या शहरांत?

नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या महापालिकांमध्ये काँग्रेस पूर्णपणे स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तर लातूर महानगरपालिका निवडणुकीत 5 जागा वंचितला सोडण्यात आल्या असून बाकी सर्व जागा काँग्रेस लढत आहे. नांदेडमध्ये 20 जागा वंचितला बाकी सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *