अश्रूंचा बांध फुटला, एकीला आली भोवळ; आमदाराच्या फलकालाही काळे फासले: भाजपने 10 माजी नगरसेवकांच्या कुटुंबात दिले तिकीट; काँग्रेसचा 2 माजी नगरसेवकांना नकार‎ – Akola News

.

महापालिका निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पक्षांतर्गत घमासान झाले. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह थेट निवडणूक प्रमुखांच्या घरीच धाव घेतली. तेथे त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. एक महिला तर भोवळ येऊन पडली. त्यांनी थेट पैशांचा आरोप करत आपल्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. भाजपने २१ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. मात्र उमेदवारी न दिलेल्या या २१ पैकी १० माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देत रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेसनेही दोन माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली नाही. परिणामी उमेदवारी न मिळालेल्या समर्थकांनी आमदारांचा फोटो असलेल्या फलकाला काळे फासत संताप व्यक्त केला. एकूणच निष्ठावानांना बाहेरचा रस्ता अन् आयारामांना ‘रेट कार्पेट’ असे काहीसे चित्र होते.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला. युती-आघाडीसाठी त्या-त्या घटक पक्षांमध्ये चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात युती झाली तर शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वबळावर लढावे लागत आहे. तसेच महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली असून, शिवसेनेने (ठाकरे गट) “एकला चलोरे’चा नारा दिला. परिणामी ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक घमासान सत्ताधारी भाजप व विरोधक असलेल्या काँग्रेस, शिवसेनेत झाले. स्वपक्षाने उमेदवारी नाकारलेल्यांनी अन्य पक्षातून उमेदवारी अर्ज भरला. आता राजकीय व अधिकृत उमेदवारांसमोर बंडोबांना शात करत त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

आम्हाला हे फळ मिळत आहेत : महायुतीमध्ये राकाँच्या वाट्याला प्रभाग सुटल्याने उर्वरित पान ४ शिवसेना ठाकरे गट : ५५ उमेदवार असून, यात काँग्रेसचे २ , भाजपच्या दोघांनाही संधी दिली आहे. भाजपने ठाकरे गटातील एका माजी नगरसेविकेला तिकीट दिल्याने हिशेब चुकता केला. वंचित बहुजन आघाडी : पक्षाने ५७ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, एका माजी नगरसेविकेला तिकिट नाकारले आहे. मुंबईत काँग्रेससोबत आघाडी असली तरी शहरात नाही. निवडणुकीपूर्वी भाजपमधील दुरावलेल्यांकडून तिसरी आघाडीची तयारी करण्यात आली. काहींनी थेट जनतेमध्ये जात बैठकही घेतली. यात माजी नगरसेवक हरिश आलीमचंदानी, डॉ.अशोक ओळंबे, आशिष पवित्रकार, गिरीश गोखले आदींचा समावेश होता. मात्र मंगळवारी यापैकी प्रतुल हातवळणे, गिरीश गोखले यांचे निलंबन परत घेऊन पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला; परंतु त्यापैकी केवळ हरिश आलीमचंदानी यांनाच उमेदवारी देण्यात आली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षापासून दुरावलेल्या काहींना जवळ करीत मोट बांधूच द्यायची नाही, अशी खेळी भाजपकडून खेळण्यात आली. काँग्रेस : पक्षाने १३ पैकी ११ माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली असून दोन जणांना उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने एकूण ५५ उमेदवार उभे केले आहेत. शरद पवार गटासोबत आघाडी आहे. भाजपचे १९९४ ते २०१९पर्यंत आमदार असलेले दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या जुने शहरातील अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आली. आ. शर्मा यांनी जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातून आपली राजकीय कारकिर्द १९८५मध्ये सुरू केली. याच भागातून ते नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. मात्र आता मनपामध्ये याच भागातील प्रभागातून उमेदवारी जाहीर झालेल्या चारपैकी दोन जण मूळचे काँग्रेसचे तर एक उमेदवार शिवसेनेच्या ठाकरे गटाची आहे. आयात उमेदवारांना संधीत देत निष्ठावानांना मात्र डावलण्यात आले. तसेच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दिवंगत आ. शर्मा यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता माजी महापौरांना संधी देण्यात आली. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ३० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने खेचून आणला. आता मनपा निवडणुकीतही आ. शर्मा यांच्या समर्थकांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राकाँ शरद पवार पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकूण ८० पैकी २४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यात सर्व नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : राकाँ अजित पवार गटाची भाजपसोबत युती आहे. राकाँने १४ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, यात माजी महापौरांच्या कुटुंबातील महिलेला संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गट : शिवसेनेने ७४ जणांना उमेदवारी दिली. उपजिल्हा प्रमुख, एक विद्यमान नगरसेवक व उपशहर प्रमुखाला उमेदवारी नाकारून अन्य पक्षातील इच्छुकांना संधी दिली.

पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याची आखली रणनिती भाजप : उमेदवारीसह अन्य मुद्द्यांसाठी भाजपने सर्वेक्षण केल्याचा दावा केला. मनपामध्ये सत्ता असताना अनेक मुद्द्यांवर काही नगरसेवकांनी स्थानिक पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला विरोध केला. प्रभागात विकास कामे मंजूर करण्यावरून अर्थात ‘रसद’वरुनही वाद झाले. विधानसभा, राज्य पातळीवरील नेत्यांनी मनपाच्या राजकारणात फार ढवळाढवळ करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. तसेच त्यापैकी काहींनी अकोला पश्चिमच्या विधानसभा निवडणुकीत ‘काम’ दाखवले. परिणामी भाजपचा पराभव झाला. त्यामुळे आता स्थानिक नेतृत्वाकडून अनेकांना उमेदवारी नाकारून पक्षांतर्गत काहींचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस : मनपामध्ये १३ पैकी अल्पसंख्यांक बहुल भागातील २ नगरसेवकांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराला पक्षांतर्गत विरोध झाला. तसेच काही जण एमआयएमच्याही संपर्कात होते. परिणामी काँग्रेसमध्येही कुरघोडीचे राजकारण रंगले.

तिसऱ्या आघाडीतील हवाच काढली

सत्ताविरोधी लाट थोपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप रस्ते, पथदिवे, काही भागात भूमिगत नाली बांधण्याचा दावा करत असले तरी सध्या अवाढव्य मालमत्ता कर व अवाजवी पाणी कर, हे दोन मुद्दे प्रचंड तापले आहेत. त्यामुळे सत्ताविरोधी लाट थोपवण्याच्या नावाखाली २१ माजी नगरसेवकांना संधी नाकारण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतील माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली. जेणे करुन विरोधक आणखी कमकुवत होईल आणि आयात केलेला उमेदवारच जनतेला फेस करेल. मात्र हे करताना त्या-त्या भागातील बंडखोरांना शांत करण्याचे आणि संधी न मिळूनही पक्षात कायम राहिलेल्यांना सक्रिय करण्याचे आव्हान पक्षासमोर उभे ठाकणार आहे.

दिवंगत आमदार शर्मा यांच्या समर्थकांना डावलले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *