Deputy Chief Minister Shinde meets angry Jagdish Gupta | उपमुख्यमंत्री शिंदे नाराज जगदीश गुप्तांच्या भेटीला: अमरावतीत 25 मिनिटे चर्चा, गुप्तांच्या परतीचे संकेत – Amravati News



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी नियोजित मार्ग बदलून सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात नाराज जगदीश गुप्ता यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे ‘वन टू वन’ चर्चा झाली. यानंतर गुप्ता यांनी पुन्हा पक्षात परतण्याचे स

.

जगदीश गुप्ता यांनी ३० डिसेंबर रोजी शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ संघटन प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. तिकीट वाटपावरून महायुतीमध्ये न झालेली एकजूट आणि पक्ष नेतृत्वाबद्दलची नाराजी ही त्यांच्या राजीनाम्याची प्रमुख कारणे होती.

आजच्या सभेत गुप्ता मंचावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी अडीच मिनिटांचे भाषणही दिले. या भाषणात त्यांनी आपण सर्व भगवाप्रेमी असून आगामी निवडणुकीत भगव्यालाच विजयी करण्याचे आवाहन केले.

गुप्ता हे दोन वेळा आमदार आणि एकदा विधान परिषद सदस्य राहिले आहेत. ते पूर्वी भाजपमध्ये होते आणि युतीच्या सत्ताकाळात जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. भाजपमध्ये पुन:प्रवेश करूनही ते रमले नाहीत आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

या राजकीय घडामोडीनंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना गुप्ता यांनी परतीच्या प्रश्नावर होकारार्थी उत्तर दिले. सभेच्या मंचावर त्यांना शिंदे यांच्या शेजारी मिळालेली खुर्ची आणि त्यांच्या भाषणातील ‘भगव्याला विजयी करण्याचे’ आवाहन यातून त्यांच्या परतीचे स्पष्ट संकेत मिळाले.

जगदीश गुप्ता हे सिपना एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या संस्थेचे चिखलदरा आणि अमरावतीत मोठे शैक्षणिक जाळे आहे. सत्तेच्या जवळ राहणे त्यांच्यासाठी नेहमीच श्रेयस्कर ठरते, हे त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या लक्षात आणून दिले होते. शिवाय, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः त्यांच्या भेटीला येणे ही एक महत्त्वाची बाब मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *