![]()
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेने ठाकरे गटाने आपली कंबर कसली असून, रविवारी रात्रीपासून उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावून अनेक उमेदवारांच्या हातात उम
.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, त्यांना काल रात्री तातडीने ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या हातात ‘एबी’ फॉर्म सुपूर्द केले. काही उमेदवारांना काल रात्रीच फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना आज सकाळी 11 वाजेनंतर बोलावण्यात आले आहे. कोणाला उमेदवारी दिली जात आहे, याची माहिती बाहेर पडू नये यासाठी प्रचंड खबरदारी घेतली जात असून, पक्ष कार्यालयाकडूनही याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी होणारी बंडखोरी आणि नाराजी टाळण्यासाठी शिवसेनेने ही विशेष रणनीती आखली आहे. अधिकृत यादी जाहीर करण्यापूर्वीच ‘एबी’ फॉर्म देऊन उमेदवारांना तातडीने अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत उमेदवार आपले अर्ज दाखल करतील, जेणेकरून बंडखोरांना संघटित होण्यास वेळ मिळणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली अधिकृत उमेदवारांची यादी आजच जाहीर होण्याची शक्यता असून, यात संभाव्य नावे समोर आली आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
प्रभाग क्र. ५४- अंकित प्रभू प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे प्रभाग क्र. ६०- मेघना विशाल काकडे माने प्रभाग क्र. ६१- सेजल दयानंद सावंत प्रभाग क्र. ६२- झीशान चंगेज मुलतानी प्रभाग क्र. ६३- देवेंद्र (बाळा) आंबेरकर प्रभाग क्र. ६४- सबा हारून खान प्रभाग क्र. ४०- सुहास वाडकर प्रभाग क्र. २०६- सचिन पडवळ प्रभाग क्र. ९३- रोहिणी कांबळे प्रभाग क्र. १००- साधना वरस्कर प्रभाग क्र. १५६- संजना संतोष कासले प्रभाग क्र. १६४- साईनाथ साधू कटके प्रभाग क्र. १६८- सुधीर खातू वार्ड प्रभाग क्र. १२४- सकीना शेख प्रभाग क्र.१२७- स्वरूपा पाटील प्रभाग क्र. ८९- गितेश राऊत प्रभाग क्र. १४१- विठ्ठल लोकरे प्रभाग क्र. १४२- सुनंदा लोकरे प्रभाग क्र. १३७- महादेव आंबेकर प्रभाग क्र. १३८- अर्जुन शिंदे प्रभाग क्र. १६७- सुवर्णा मोरे प्रभाग क्र. १५०- सुप्रदा फातर्फेकर प्रभाग क्र. ९५- चंद्रशेखर वायंगणकर प्रभाग क्र. २१५- किरण बालसराफ प्रभाग क्र. २१८- गीता अहिरेकर प्रभाग क्र. २२२- संपत ठाकूर प्रभाग क्र. २२५- अजिंक्य धात्रक
