Pune Sharad Pawar NCP MVA Betrayal Allegation; Thackeray Group Attack Over Ajit Pawar Alliance Meeting | शरद पवारांच्या NCP ने MVA ला धोका दिला: शेवटपर्यंत आमच्याशी चर्चा केली अन् अखेर अजित पवारांशी हातमिळवणी, ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप – Maharashtra News


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शेवटपर्यंत महाविकास आघाडीशी चर्चा केली. पण त्यानंतर त्यांनी आम्हाला धोका देत अजित पवारांशी हातमिळवणी केली, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ए

.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या प्रकरणी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांना गृहीत धरले होते. आमच्या मागील 3-4 महिन्यांत अनेक बैठकाही झाल्या. त्यात पिंपरी चिंचवड निवडणूक मिळवून लढवण्याचा निर्णय झाला. पण अचानक त्यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाविकास आघाडीसाठी धक्काच आहे, असे ते म्हणाले.

अजित पवारांशी घरोबा करत केली फसवणूक

महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात आहे तशी ती पिंपरी चिंचवडमध्येही असावी अशी आमची ठाम भूमिका होती. त्यानुसार जागावाटपावर चर्चाही झाली होती. पण दुर्दैवाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या. आमची फसवणूक झाली. त्यांनी आमच्याशी शेवटपर्यंत चर्चा केली. त्यानंतर अजित पवारांशी घरोबा करत आमची फसवणूक केली. महाविकास आघाडीचा प्लॅन A फोल ठरला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला वगळून प्लॅन B तयार केला जात आहे, असे चाबुकस्वार म्हणाले.

भाजप – शिवसेना युतीची घोषणाही रखडली

दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजप व शिवसेनेची युतीही रखडली आहे. असे असले तरी दुसरीकडे, भाजपचे 128 जागांचे सर्व एबी फॉर्म प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. भाजपने याला दुजोरा दिला आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे इथे युती तुटली तर भाजप व आठवलेंची रिपाइं एकत्र लढणार आहे. विशेषतः या प्रकरणी शिंदे गटाने अधिक जागांची मागणी केली तर भाजपने सर्व 128 जागांचे एबी फॉर्मही तयार ठेवलेत. त्याची माहिती त्यांनी शिवसेनेलाही दिली आहे.

हे ही वाचा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अखेर एकत्र:पुणे, पिंपरी चिंचवड मनपा एकत्र लढवणार -रोहित पवार; कुणाला किती जागा? हे गुलदस्त्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी रात्रीच यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटानेही त्यावर मोहोर उमटवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबाने पुन्हा एकत्र होण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *