CJP चे आज जंतरमंतरवर आंदोलन:पोलिसांची परवानगी नाही; दिल्लीला येणाऱ्या 250 ट्रेन रद्द, 45 मेट्रो स्टेशन बंद, 38 हजारांचा फौजफाटा तैनात

[ads1]


कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आज दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सीजीपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला अद्याप परवानगी दिली नाही. CJP ने ७ ऑक्टोबर रोजी आंदोलनाची माहिती दिली होती, तर नियमानुसार १० दिवस आधी अर्ज करणे आवश्यक असते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर, कनॉट प्लेस आणि जनपथ रोडसह आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुमारे ३८ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात BSF जवानांचाही समावेश आहे. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या २५० मेल आणि एक्सप्रेस गाड्या आज रद्द राहतील. ४५ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत, तर १० नजरकैद केंद्रे तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, इंडिया गेटच्या आसपास ४ किमीच्या परिसरात शुक्रवार रात्री १० वाजल्यापासून आज रात्री १० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *