Mumbai BMC Election BJP Candidates Tejinder Tiwana Navanath Ban Neel Somaiya Announced | मुंबई महानगरपालिका निवडणूक: भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर; नील सोमय्या, नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात – Mumbai News



आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी या

.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती आखली असून, मानखुर्द-शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन आणि वॉर्ड क्रमांक 107 मधून भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वीच या प्रमुख उमेदवारांना त्यांचे अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, हे सर्व उमेदवार आजच आपला उमेदवारी अर्ज भरतील, अशी माहिती समोर आली आहे.

भाजप यंदा मुंबईत एकूण 128 जागांवर निवडणूक लढवत असून, पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी गुलदस्त्यात ठेवली आहे. असे असले तरी, दादर येथील ‘वसंतस्मृती’ कार्यालयातून रविवार रात्रीपासूनच पात्र उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने भाजपने ही खबरदारी घेतली असून, यादी जाहीर झाल्यानंतर नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी संबंधित आमदारांवर सोपवण्यात आली आहे.

भाजपच्या मुंबईतील उमेदवारांची यादी

नील सोमय्या (वॉर्ड क्रमांक 107) तेजिंदर सिंग तिवाना (वॉर्ड क्रमांक 47) नवनाथ बन (वॉर्ड क्रमांक 135) शिवानंद शेट्टी (वॉर्ड क्रमांक 9) संतोष ढाले (वॉर्ड क्रमांक 215) स्नेहल तेंडुलकर (वॉर्ड क्रमांक 218) अजय पाटील (वॉर्ड क्रमांक 214) सन्नी सानप (वॉर्ड क्रमांक 219) तेजस्वी घोसाळकर (वॉर्ड क्रमांक 2)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *