“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात भारताच्या आत्मनिर्भरतेवर भर दिला आहे. त्यादिशेने वाटचाल करताना सरकारकडून स्वदेशी उद्योग व व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात येणारी उत्पादने पुण्यातील ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ तयार करतेय, ही अभिमानाची बाब आहे. तसेच व्यवसाय चालवत असताना समाजसेवा, राष्ट्रासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन गुजरातचे माजी मंत्री आत्माराम परमार यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’, या तंत्रज्ञान व नवकल्पनाविषयक तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत परमार बोलत होते. हिंजवडीतील हॉटेल विवांता येथे आयोजित या कार्यक्रमावेळी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष मुकुंद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप, सहकार्यकारी अध्यक्ष स्मिता शितोळे-जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन झाल्यानंतर मॉसचीप कंपनीचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांचे मार्गदर्शन झाले. जगाच्या तुलनेत तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या बाबतीत भारत आता कोणच्या टप्प्यावर आहे, यासह येणाऱ्या काळात एआय, इंटरनेट ऑफ थिंग्ज, वायरलेस टेक्नॉलॉजी, ५-जी तत्रंज्ञान, डेटा सिक्युरिटी आदी विषयांवर त्यांनी विस्तृत विवेचन केले. ‘इस्त्रो’चे माजी शास्त्रज्ञ डॉ. नवलकिशोर गुप्ता यांनी अवकाश तंत्रज्ञानाविषयी सांगताना मंगळयान, चांद्रयान यांच्या निर्मितीचा प्रवास सांगितला. तसेच या उपकरणांमध्ये द्रव हायड्रोजनचा उपयोग, भारताच्या चांद्रयान मोहिमेमध्ये यानासाठी वापरल्या गेलेल्या हायड्रोजनच्या संशोधनामध्ये असलेला सहभाग आणि त्यातील तांत्रिक गोष्टींविषयी माहिती दिली. …तरच तुमचा ‘एआय’च्या युगात टिकाव लागेल ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उद्याच्या सीमेपलीकडे’ या विषयावर बोलताना तंत्रज्ञान, अर्थ विषयातील तज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गोडबोले म्हणाले, येत्या दहा वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपले आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. चीन, जपान अमेरिका यांसारख्या देशांमध्ये वैद्यकीय यंत्रणा, रेस्टॉरंट, मॉल, उत्पादन कंपन्या यांसारख्या क्षेत्रात आताच एआय मोठ्या प्रमाणात कार्यरत असून येत्या काही वर्षात याचे प्रमाण जगभरात वाढणार आहे. येत्या काळात एआय ५.० येणार असून, एआय एजंट, रोबोट हे मानवावर नियंत्रण मिळवतील. ‘एआय’मुळे नोकऱ्या धोक्यात आहेत, असे बोलले जाते, ते काही प्रमाणात खरे आहेच; पण व्यक्तीने आपल्या क्षेत्रातील नवनवीन कौशल्ये आत्मसात केली, व्यक्तिमत्त्व विकास केला, कल्पकतेवर काम केले, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ‘एआय’च्या काळातही तुमचा टिकाव लागेल. येत्या पाच ते दहा वर्षात तंत्रज्ञान कशाप्रकारे बदलेल आणि किती नोकऱ्या कशाप्रकारे जातील, हे सांगणे अवघड आहे. मात्र ‘एआय’ला भावना, कल्पकता आणि जाणीवा आहेत की नाही, हे प्रश्न अद्यापही कायम आहेत, असेही गोडबोले यांनी नमूद केले.
देशाच्या सुरक्षेसाठी आर्यन्स ग्रुपची उत्पादने अभिमानाची बाब: परमार:'एडब्ल्यूटीआयएस 2026' परिषदेत 'इस्रो' शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन