सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची जर इच्छाच नसेल तर आपण काय करू शकतो. या कारखान्यात तिरंगी लढत होत आहे. कुणालाच काय सांगता येणार नाही, पण आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरवला जाणार नाही. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चांगली परिस्थिती असून, आपल्या पॅनेलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही युगेंद्र पवार यांनी केला. ते म्हणाले, मी कुणावरही आरोप केला नाही, मी सत्य परिस्थिती मांडली. जर सत्य परिस्थिती मांडल्याने काही लोकांना ते लागलं असेल, आवडलं नसेल, त्याबद्दल आपण काय बोलू शकतो. जे तथ्य आहे ते तथ्य आहे. त्याच्यामध्ये बोलणं काही चूक आहे असं मला वाटत नाही. युगेंद्र पवार म्हणाले, मी जे म्हणतो आहे तीच वस्तुस्थिती आहे, उगाच काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलणार नाही. आत्यांच्या घरी भेटलो होतो पण त्याच्यामध्ये काही ठरलं नव्हतं. आम्ही सगळे भेटत असतो. यावर्षी पार्थ दादाचं लग्न आहे, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. राजकारण हे वेगळं ठेवलं पाहिजे. एकमेकांवर कोणतीही टीका करायची यासंदर्भात चर्चा झाली नव्हती. मी तिथे त्यांना विचारलं होतं का कारखान्याची निवडणूक आहे. घरामध्ये या वर्षी लग्न आहे, दादांना जाऊन काही महिने झाले मग आपण कशाला एकमेकांसमोर उभे राहायचं?, अशी चर्चा झाल्याचं युगेंद्र पवार म्हणाले. सहकारामध्ये राजकारण नाही आणलं पाहिजे. आपण एकत्र येऊन कारखाना चालवू असं मी म्हटलं होतं. एकत्र यायला काय हरकत आहे, अशी भूमिका मांडल्याचं युगेंद्र पवार यांनी सांगितलं. साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येऊ शकत नाही, असे पार्थ पवार मला म्हणाले होते, हे खरं आहे. ते तिथले नेते आहेत. त्यांचे कार्यकर्ते माझ्याही संपर्कात होते. त्यांची इच्छा होती की एकत्र निवडणूक लढायला पाहिजे होते. पण ठराविक कार्यकर्त्यांचे मत जर तुम्ही ऐकत असेल तर त्याला दुसरी बाजू आहे. समोर दोन पॅनल आहेत, त्याच्याकडे फार आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला फक्त चांगलं काम करायचं, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. जर सगळे एकत्र आलो असतो तर एवढं वातावरण गढूळ झालं नसतं. बारामतीकर पण चांगले राहिले असते. एका चांगल्या वातावरणात कारखाना पुढे गेला असता. आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची जर इच्छाच नसेल तर आपण काय करू शकतो. या कारखान्यात तिरंगी लढत होत आहे. कुणालाच काय सांगता येणार नाही पण आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरवला जाणार नाही, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. सुनेत्रा काकींना आणि पुरुषोत्तम जगताप यांना जे काय बोलायचे ते मी बोलेल. पण कारखान्यासाठी आपण चांगलं मिळून काम करू, असं युगेंद्र पवार म्हणाले.
'आमच्याशिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही':युगेंद्र पवारांचा दावा; सोमेश्वर साखर कारखान्यात तिरंगी लढत