![]()
वसमत येथील शहरपेठ भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना शनिवारी ता. २७ रात्री घडली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी वसमत पोलिसांनी तातडीने मारेकऱ्यांचा श
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील शहरपेठ भागात नारायण सर्जेराजे हा त्याची दुचाकी घेऊन गेला होता. यावेळी दुचाकी आणण्याच्या कारणावरून त्याचा त्याच भागातील दोघांसोबत वाद झाला. त्यानंतर नारायण याने त्याचा मित्र गणेश गायकवाड व अन्य एकास बोलावून घेतले. त्यामुळे वाद वाढतच गेला. शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी सुरु झाली. यामध्ये दोघांनी नारायण व गणेश यांच्या पोटात तसेच पाठीवर खंजीरने वार केले तसेच अन्य एकाच्या डोक्यातही वार केले. यामध्ये गणेश व नारायण गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदारे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, दिनेश म्हात्रे, अजय पंडीत, इमरान कादरी, सुरेश जाधव, गुहाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच मारहाण करणाच्या दोघांनी पळ काढला.
दरम्यान, घटनास्थळी गणेश व नारायण जागीच कोसळले होते शिवाय रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता. पोलिसांनी जखमी दोघांनाही तातडीने उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोध सुरु केला आहे. तर कायदा व सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गस्त वाढवली आहे.
हे ही वाचा…
भिंगी येथील तरुण अभियंत्याचा नागपूर येथे अपघाती मृत्यू:आठ महिन्यापुर्वीच नागपूर मनपाचा झाला होता रूजू, गाववर शोककळा
हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील तरुण अभियंत्याचा नागपूर येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी ता. २७ सकाळी मृतदेहावर नागपूर येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. मयत अभियंता तेजस निमदेव (२५) हा आठ महिन्यापुर्वीच अभियंता नागपूर मनपाच रुजू झाला होता. या घटनेमुळे निमदेव कुटूुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा…
