सीमाप्रश्नी बैठकीनंतर पवारांची शिंदेंसाेबत बंद दाराआड चर्चा:30 वर्षांनंतर विधानभवनात अशा बैठकीस पवार हजर




महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात ३० वर्षांनंतर विधानभवनातील अशा बैठकीस शरद पवार उपस्थित राहिले. बैठकीनंतर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले. त्यामुळे कॅबिनेट बैठक सोडून शिंदे स्वत:च्या दालनात पोहोचले. तेथे पवारांनी आधी त्यांच्याशी बंद दाराआड २० मिनिटे चर्चा केली. नंतर पवारांनी स्वत:च्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. पवारांचे एकनाथ शिंदेंच्या दालनात जाणे सूचक शरद पवारांचा गट एनडीएत सामील होण्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, सीमाप्रश्नाच्या निमित्ताने मुख्यमंत्री व पवारांतील समन्वय काहीतरी घडत असल्याचे सांगत होता. राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदेंचे कॅबिनेट बैठक सोडून जाणे हा केवळ शिष्टाचार असू शकत नाही. पडद्यामागे काहीतरी मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *