![]()
तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप पूर्णतः मिळालेली नाही. अनेक शेतकरी रब्बीच्या पेरणी अनुदानापासूनही वंचित आहेत. शासनाच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे ते अडचणीत आले असून, त्यांच्या प्रलंबित समस्या सोड
.
सध्या शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत, तर काहींना एकही टप्पा मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांची नावे नुकसान भरपाईच्या यादीत दिसत नाहीत. तसेच, केवायसीच्या फेऱ्यांसाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या समस्यांवर उपाय म्हणून, तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संबंधित मौजातील इतर कर्मचाऱ्यांसह नियमित शिबिरे (कॅम्प) आयोजित करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईबाबतचा संभ्रम दूर होऊन त्यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल.
यासाठी तहसील प्रशासनाने तातडीने आपल्या कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी, इतर कर्मचारी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतनिहाय शिबिर घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर करावे, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी शिवणगावचे सरपंच धर्मराज खडसे, देवेंद्र घाटोळ, विजय कुरळकर, हर्षल मेश्राम, प्रदीप वाघ, गजानन खेरडे, ॲड. विकास तूरकाने, अशोक वैद्य, किरण बनसोड, गजानन वैद्य आणि प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
