![]()
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करावा, असे आवाहन महापौर ज्योती गाडे व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. याचबरोबर, महानगरपालिकेच्यावतीन े आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेत यंदा प्रथमच गड व किल्ल्यांवर आधारित ऐतिहासिक देखाव्यांचा समावेश करण्यात आला असून यासाठी विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. अहिल्यानगर महानगरपालिका आणि रेसिडेन्सी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विद्यालयातील सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत श्री गणेशाच्या विविध रूपांतील सुंदर मूर्ती साकारल्या. महापौर गाडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी नवीन मूर्ती विकत न घेता आपल्या हाताने बनविलेल्या शाडू मातीच्या मूर्तीचीच घरी पारंपरिक पद्धतीने स्थापना करावी. आयुक्त यशवंत डांगे यांनी जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर वाढविण्यावर भर दिला. दुसरीकडे गणेशोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात गणेश मंडळ अध्यक्ष आणि प्रमुखांची एक समन्वय बैठक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मनपा मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली असून सर्व मंडळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. देखावा स्पर्धेत समाजप्रबोधन, ऐतिहासिक, धार्मिक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जिवंत देखावे सादर करता येणार आहेत. महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेत गड-किल्ल्यांचा नव्याने केलेला समावेश हा केवळ एका स्पर्धेचा भाग नसून राज्याच्या वैभवशाली इतिहासाचे जतन करण्याच्या प्रगल्भ दृष्टिकोनाचा परिपाक आहे. गणेशोत्सवासारख्या सर्वांत मोठ्या सार्वजनिक व्यासपीठाचा वापर केवळ देखाव्यांसाठी न करता तरुण पिढीला आपल्या ऐतिहासिक मुळांशी जोडण्यासाठी करणे हा यामागचा उद्देश आहे. पारंपरिक गणेशोत्सवाचा मूळ गाभा टिकवून ठेवत त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची जोड देण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न असून, यातून गणेश मंडळांना ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
