[ads1]
![]()
साऊर येथील एका गणेश मंडळामागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वलगाव पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. अंधाराचा फायदा घेत १० ते १२ जण घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी रोख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख २ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास साहूर परिसरात अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पंचांसह पोलिसांचे पथक शिवाजी चौकातील गणेश मंडळामागे पोहोचले. तेथे कापडी कनातीच्या आत काही जण जुगार खेळताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच सुमारे १० ते १२ जण अंधाराचा आणि गल्लीबोळीचा फायदा घेऊन पळून गेले. या कारवाईदरम्यान साऊरमधीलच दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १,३०० रुपये रोख, टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर १२५ दुचाकी (एमएच २७-डीआर-२१६१), जुगाराचे साहित्य, सीलबंद पत्त्यांची १० पाकिटे, काही खुले पत्ते आणि प्लास्टिक कॅन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रात्री १ ते २.१० वाजेदरम्यान करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आणि फरार झालेल्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) नुसार कारवाई केली जात आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आकाश वाठोरे, जमादार इशय खांडे, शिपाई अझहर शेख, पंकज येवले आणि सोमनाथ घोलप यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad