Pune Police Arrest Two Absconding Members of Nilesh Ghaywal Gang in Kothrud | निलेश घायवळ टोळीचे दोन गुन्हेगार अटकेत: मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्यांना कोथरूड पोलिसांनी पकडले – Pune News
![]()
कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या निलेश घायवळ टोळीतील दोघांना कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोक्काच्या गुन्ह्यात ते फरार होते. पोलिसांकडून पेट्रोलिंग दरम्यान आरोपींना अटक करण्यात आली. मनीष रामकृष्ण माथवड (वय २८, रा. शोभा संकुल अपार्टमेंट, ग
.
तडीपारीचा आदेश भंग करणारा ताब्यात
तडीपारीचा आदेश असताना देखील शहरात आलेल्या सराईताला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला दोन वर्षासाठी जुलै महिन्यात जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. आकाश नरसय्या गुत्तेदार (24, रा. रेणुका निवास, प्रतिमा पॅलेसच्या पाठीमागे, पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई दि. 1 च्या मध्यरात्री केशवनगर येथे राहत्या घराजवळून करण्यात आली.
