Bombay High Court Self Immolation Attempt Prakash Sawant | मुंबई उच्च न्यायालयातच एकाने स्वतःला पेटवून घेतले: वकिलाच्या फसवणुकीला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न, जमिनीच्या वादातून टोकाचे पाऊल – Mumbai News
![]()
मुंबई न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च केंद्र मानल्या जाणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच आज दुपारी एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश सावंत असे या व्यक्तीचे नाव असून, वकिलाने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याच्या नै
.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर आज (15 डिसेंबर) दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. न्यायालयीन कामकाज सुरू असताना आणि परिसरात वकिलांची तसेच पक्षकारांची वर्दळ असताना प्रकाश सावंत यांनी अचानक अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांची भंबेरी उडाली. मात्र, प्रसंगावधान राखत तेथील सुरक्षारक्षक आणि काही नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. अंगावरील कोट आणि पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सावंत यांना तातडीने मुंबईतील जी. टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सावंत यांनी जमिनीच्या एका कामासाठी संबंधित वकिलाला 6 लाख 80 हजार रुपये दिले होते. काही कारणास्तव काम न झाल्याने किंवा वादातून वकिलाने त्यांना 6 लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित 80 हजार रुपये देण्यास वकील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टाळाटाळ करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही हक्काचे पैसे मिळत नसल्याने आणि वकिलांकडून होणाऱ्या अडवणुकीला कंटाळून सावंत यांनी थेट न्यायालयाबाहेरच स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.
