![]()
शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आता आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त शेती करावी. पारंपारिक पिके सोडून जे विकतं, ते पिकवलं पाहिजे. असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले.
.
भोकरदन तालुक्यातील अनवा येथे बालाजी अभिनव सहकारी संस्थेतर्फे नाफेड अंतर्गत सोयाबीन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. हेमंत सपकाळ जी.एस. सपकाळ आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी गट शेती करावी. गट स्थापन करून फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन करावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेष करून तरुणांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीची कास धरावी. आपण या भागामध्ये विजेची, रस्त्याची आणि पाण्याची सोय केली आहे. आता शेतकऱ्यांनी आधुनिक तिकडे वळून पारंपरिक पद्धतीने शेती सोडून द्यावी व तंत्रज्ञानयुक्त आधुनिक शेतीची कास धरावी. शासनाच्या विविध योजनेचा फायदा घ्यावा. मिरची पिक आपल्या भागामध्ये भरपूर उत्पादन घेतले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करून कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करावी, जेणेकरून आपल्याला जेव्हा भाव मिळेल तेव्हा आपले उत्पादन विकता येईल. असे आमदार दानवे म्हणाले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावरच शेतीमाल देऊन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
