![]()
जीवन खूप सुंदर आहे ते जगता आले पाहिजे, या सुंदर जीवनामध्ये जर सुंदर नेतृत्व मिळाले तर जीवन अधिक सुखकर होते. असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी केले. ते शेळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्
.
शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै नानासाहेब गायकवाड यांच्या ३४ व्या पुण्यतिथी निमित्त प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आई-वडिलांच्या शिकवणीसह त्यांना आज कशी साथ देणे गरजेचे आहे. याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर वेगाने बदलणाऱ्या सत्ता संघर्षामध्ये सुंदर नेतृत्व असेल तर सुंदर कार्यभार देखील करता येतो, असे देखील सांगितले.
यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल बाबा गायकवाड यांचा शेळगाव शिक्षक प्रसारक मंडळातील संचालकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आ. राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली उपसभापतीपद बाबा गायकवाड यांना मिळाल्यामुळे शैक्षणिक, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शेळगाव गावाचा नावलौकिक वाढला आहे असे देखील हंकारे म्हणाले. या कार्यक्रमास भारत देशमुख, बळीराम बादगुडे, वासुदेव गायकवाड ,सचिन बादगुडे, बजरंग गायकवाड, मुख्याध्यापक सुनील गोरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजित गायकवाड यांनी केले तर आभार प्रवीण गाढवे यांनी मानले.
