Shafepur is the stronghold of devotees and Pishore is the home of the ocean of devotion – Mauli Maharaj | शफेपूर भक्तांचा बालेकिल्ला अन् पिशोर भक्ति सागराचे माहेरघर -माउली महाराज: पिशोर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता‎ – Chhatrapati Sambhajinagar News


.

पिशोर गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा १५५ वर्षे पूर्ण झाली. रविवारी, २१ तारखेला मंडपात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. गुरुवर्य माऊली महाराज अन्वेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, हा सप्ताह श्री दादा महाराज अन्वेकर यांच्या कृपाशीर्वादाने सुरू झाला. आजवर गावकऱ्यांनी ही परंपरा जपली. शफेपूर हे भक्तांचा बालेकिल्ला असून, येथे मन रमते. पिशोर हे भक्ती सागराचे माहेरघर आहे.

माऊली महाराज म्हणाले, १९८५ साली सप्ताहाला १०० वर्षे पूर्ण झाली होती. त्या काळातील आठवणी आजही ताज्या आहेत. गावाने वारकरी संप्रदायाला अनेक रत्ने दिली. मोठ्यांचा आदर करणारी लेकरे असतील, तर बापानेही त्यांचे ऐकायला हवे, असे त्यांनी सांगितले. नंदबाबा आणि यशोदे मातेच्या भक्तीचा दाखला देत त्यांनी प्रेम, श्रद्धा आणि तपश्चर्येचे महत्त्व सांगितले.

कीर्तनाचे आयोजक राजू मोकासे यांनी गुरुमाऊली यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मृदंगाचार्य मोरे महाराज, विनायकरी सोपान मोकासे, चोपदार बाजीराव सुरडकर, तुळशीदास तोडकर, गायनाचार्य एकनाथ महाराज शेलार, राजू महाराज मोकासे, भानुदास महाराज सुरडकर, ज्ञानेश्वर महाराज दवंगे, चंद्रभान नवले, गोविंद सुरडकर, रामदास महाराज मोकासे, नंदू सुरडकर, आकाश महाराज सोनवणे, गोकुळ सुरडकर, तुकाराम सुरडकर, वासुदेव राठोड, सोपान महाराज सुरडकर, ज्ञानेश्वर महाराज सुरडकर, तुकाराम महाराज सुरडकर, प्रदीप महाराज शेलार यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. महाप्रसादासाठी शफेपूरमधील सर्व समाजांनी दोन किलो हरभऱ्याच्या डाळीचे पुरणपोळी तयार केल्या. तीन ट्रॅक्टर भरून पुरणपोळ्या जमा झाल्या. बासुंदीसाठी ११०० क्विंटल दूध वापरले गेले.

आठ क्विंटल हरभऱ्याच्या डाळीचा सार बनवण्यात आला. प्रत्येक घरातून चार कुरडई व चार पापड जमा करून एक ट्रॅक्टर भरून पापड तयार करण्यात आले. भजेही बनवण्यात आले. पारावरच्या मुलांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. गावकऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

महाप्रसादासाठी चार दिवस आधी प्रदूषणविरहित केळीची पाने कापून आणली गेली. परिसरातील अंदाजे २० ते २५ हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मागील वर्षीही अशाच प्रकारे प्रदूषणविरहित भंडारा झाला होता.

कीर्तन संपल्यावर सोहळ्यातच पार पडला लग्न सोहळा प्रभाकर नारायण दवंगे यांची कन्या शितल व संजय भागवत यांचे चिरंजीव योगेश यांचा विना खर्च लग्न सोहळा पार पडला. लग्ना साठी समाज व संत मंडळी कडून वधू वरास शुभ आर्शिवाद मिळाले. या लग्नासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *