बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेडमध्ये बहुजन नायक मान्य. कांशीरामजी साहेब यांचा २० वा स्मृतिदिन भव्य स्वरूपात संपन्न

बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेडमध्ये बहुजन नायक मान्य. कांशीरामजी साहेब यांचा २० वा स्मृतिदिन भव्य स्वरूपात संपन्न
नांदेड (दिनांक ९ ऑक्टोबर २०२६):
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक, बामसेफ आणि डी.एस.फोर चे प्रणेते बहुजन नायक मान्य. कांशीरामजी साहेब यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त (बहुजन सामाजिक परिवर्तन दिवस) नांदेड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बसपा मराठवाडा झोन कार्यालय, वाय कॉर्नर, गणेशनगर रोड, नांदेड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात बहुजन चळवळीतील अनेक दिग्गज नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘कांशी तुम्हारी नेक कमाई, तुमने सोती हुई कौम जगाई!’ या प्रेरणादायी घोषणेसह मान्यरावांनी कांशीरामजी साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.


मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला बहुजन समाज पार्टीचे प्रमुख नेते व पदाधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी लाभले होते. यामध्ये प्रामुख्याने:
* मा. मुकुंददादा सोनवणे (प्रदेश महासचिव)
* मा. ॲड. संजीव सदाफुले (प्रदेश महासचिव)
* मा. अब्दुल रऊफ (प्रदेश कोषाध्यक्ष)
* मा. मनीषभाऊ कावळे (प्रदेश सचिव तथा मराठवाडा झोन प्रभारी)
* तसेच प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, विलास शेखरखाने आणि रमेश भिसे पाटील उपस्थित होते.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित
या कार्यक्रमासाठी हिंगोली-परभणीचे निरिक्षक देवराव खंदारे यांच्यासह नांदेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे, परभणीचे जिल्हाध्यक्ष युवराज सूर्यतळे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष देवराव भगत, धाराशिवचे प्रा. माधव वाघमारे, लातूरचे सिद्धार्थ सूर्यवंशी, छत्रपती संभाजीनगरचे विजय बचके, बीडचे डॉ. अनंत गायकवाड, सोलापूरचे बबलू गायकवाड, साताराचे आनंद थोरवडे, सांगलीचे लहरीदास कांबळे आणि कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष रविंद्र कांबळे उपस्थित होते.
तसेच विविध विधानसभा क्षेत्रांचे प्रभारी आणि बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *