पाचवीच्या विद्यार्थ्याला चापट मारणाऱ्या शिक्षकावर गुन्हा:विद्यार्थ्याच्या वडिलांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल‎

महाराष्ट्र




शाळेत मुलांच्या आपापसातील वादातून वर्गशिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गालावर थापडा मारल्याची घटना भाजीबाजार येथील महापालिका उच्च प्राथमिक शाळेत घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात ८ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रहिवासी ११ वर्षीय मुलगा हा भाजीबाजार येथील मनपा शाळेत पाचवीत शिकतो. ७ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजताच्या सुमारास वर्गात विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू झाले. इतर मुले अंगावर मारहाण करण्यासाठी धावून आल्याने बचाव करताना या पीडित बालकाने त्यांना दूर ढकलले. हा प्रकार पाहून वर्गशिक्षकाने त्या बालकाच्या गालावर थापडा मारल्या. हा प्रकार माहीत होताच विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. मुलाचा गाल दिसला लाल : शाळा सुटल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मुलगा घरी परतला. त्यावेळी त्याच्या गालावर लाल निशाण दिसून आले. त्यावेळी वडिलांनी मुलाला विचारणा केली असता त्याने शिक्षकाने मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी बालकाची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शिक्षकाविरुद्ध कलम ११५(२) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ज्या व्यक्तीकडे बालकाची प्रत्यक्ष जबाबदारी किंवा नियंत्रण आहे, ती व्यक्ती बालकाला मारहाण करते, त्याला सोडून देते, त्याच्याशी गैरवर्तन करते, त्याला धोकादायक परिस्थितीत ठेवते किंवा जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्यामुळे बालकाला अनावश्यक शारीरिक किंवा मानसिक त्रास होण्याची शक्यता असते, तर असे कृत्य या कलमाखाली गुन्हा ठरू शकते. दुसऱ्या व्यक्तीकडून असे कृत्य करवून घेणे किंवा त्यास प्रवृत्त करणे याचाही समावेश होतो. या गुन्ह्यात ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद केलेली आहे. तक्रारीवरुन गुन्हा केला दाखल; शिक्षकाला अटक करणार या प्रकरणात पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षकाला अद्याप अटक केली नसून, लवकरच अटक केली जाणार आहे. सीमा दाताळकर, ठाणेदार खोलापूरी गेट पोलिस ठाणे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *