चिखलदऱ्याला दररोज एसटी बससेवा द्यावी:हनी व्हिलेजवासीयांनी परिवहन मंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी‎



चिखलदरा या पर्यटन स्थळासाठी आठवड्यातून एक दिवस सुरु केलेली बससेवा दररोज द्यावी,’ अशी मागणी आमझरी या ‘हनी व्हिलेज’वासीयांनी केली. त्यांच्यामते महाबळेश्वरच्या धर्तीवर विकासासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी हे आवश्यक असून, त्यामुळे चिखलदऱ्यासह आमझरीचे म

.

पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा, स्थानिक आदिवासी व व्यावसायिकांच्या रोजगाराला चालना मिळावी, यासाठी अमरावती ते चिखलदरा (हनी व्हिलेज आमझरी मार्गे) दररोज किमान दोन इलेक्ट्रिक बसेस आणि एक साधी बस तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी चिखलदरावासीयांनी केली आहे. आता यावर पालकमंत्री आणि परिवहन विभाग काय पावले उचलणार, याकडे विदर्भातील पर्यटकांचे लक्ष लागले आहे.या निवेदनाच्या प्रती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अमरावतीचे विभागीय नियंत्रक यांनाही पाठवून या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मेळघाटातील घाटवळणाच्या रस्त्यांवरुन आता लवकरच अशा एसटी बसेस धावताना दिसतील.

…म्हणून खासगी सेवेचा घ्यावा लागतो आधार सरकारी बससेवा नसल्याने पर्यटकांना चिखलदऱ्याला जाण्यास खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास खर्चिक असल्याने पर्यटन वाढीला खीळ बसत आहे. गतवर्षी पर्यटकांच्या खासगी वाहनांमुळे चिखलदऱ्यात गर्दी झाली होती की, वाहतूक व्यवस्था सांभाळताना प्रशासनाची तारांबळ उडाली. या समस्येबाबत लोकप्रतिनिधींना निवेदने दिली मात्र त्यावर कारवाई झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *