वैजापूर पोलिसांचे खंडाळ्यात पथसंचलन:प्रवेशद्वारापासून प्रारंभ करत संपूर्ण गावातून पथसंचलन




प्रतिनिधी | खंडाळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, संवेदनशील भागात गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३०) खंडाळ्यात पथसंचलन करण्यात आले. वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन पोलिस, राज्य राखीव दलाच्या मदतीने झाले. येथील प्रवेशद्वारापासून प्रारंभ करत संपूर्ण गावातून पथसंचलन करण्यात आले. या प्रसंगी पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, एपीआय विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे, पोलिस उपनिरीक्षक पाडळे, पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक आर. आर. जाधव, बिट जमादार विशाल पडळकर, गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे, प्रशांत गीते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *