![]()
केंद्र सरकारच्या ‘अमेरिकन ट्रेड डील’च्या विरोधात दिल्लीतील किसान घाटावर आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी आणि नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. राजघाट परिसरातून आंदोलनासाठी जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर राजू शेट्टी यांचा संताप अनावर झाला असून, “मोदी सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? आता शेतकऱ्यांनाही दिल्लीत अडवू लागलात, तर तुम्हाला तुडवू!” असा थेट आणि आक्रमक इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. ‘विद्यार्थ्यांनंतर आता शेतकरी आंदोलन चिरडण्याचा डाव’ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर आणि दडपशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज केल्यानंतर, आता आज किसान घाटावर ‘अमेरिका ट्रेड डील’विरोधात होणारे शेतकरी आंदोलनही चिरडण्याचा डाव सरकारने आखला आहे.” सरकारच्या या भूमिकेमुळे देशभरातील शेतकरी वर्गात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. ‘मोदी सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का?’ सरकारच्या अटकसत्रावर तीव्र आक्षेप घेत राजू शेट्टी पुढे म्हणाले, “आपल्या हक्कासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे अडवून तुरुंगात टाकले जात आहे. मोदी सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? जर तुम्ही शेतकऱ्यांना असेच दिल्लीत अडवू लागलात, तर शेतकरी तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. १५४ शेतकरी संघटनांचा किसान घाटावर एल्गार अमेरिकेसोबत होणाऱ्या या व्यापारी करारात देशांतर्गत शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप करत, देशभरातील तब्बल १५४ पेक्षा अधिक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि हजारो शेतकरी दिल्लीतील ‘किसान घाटावर’ एकवटले आहेत. हा करार रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत तणाव वाढला; राजू शेट्टींची पोस्ट चर्चेत आपल्याला ताब्यात घेतल्याची माहिती देताना राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सरकारचा निषेध नोंदवला. “महादेव जानकर आणि मला दिल्लीत राजघाट परिसरात शेतकरी आंदोलनास जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर आणि पोलिसांनी सुरू केलेल्या या अटकसत्रामुळे दिल्लीतील वातावरण अधिकच तापले असून, आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेही वाचा.. CJPचे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू: समर्थकांनी रात्रीतून पुन्हा स्टेज उभा केला; अभिजीत दीपके म्हणाले- आज पुन्हा संसद मार्च कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP चे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. CJP च्या संसद मार्चनंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जंतर-मंतर रिकामे केले होते. पण, आंदोलक आणि अभिजीत दीपके 6 तासांनंतर पुन्हा परतले. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दीपके यांनी इंडिया टुडेसोबत खास बातचीतमध्ये सांगितले की, ते मंगळवारीही संसद मार्च करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाहीत. सविस्तर वाचा अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा जास्त- देशपांडे:साकीनाका, चेंबूर दुर्घटनेवरून मनसे आक्रमक; दोषींवर कारवाईसाठी उद्या मुंबईत आंदोलन दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीमाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा लाठीमार जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा असल्याचा आरोप करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली. तसेच मुंबईतील चेंबूर दुर्घटनेतील जबाबदारांवर कारवाईच्या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर मनसे आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सविस्तर वाचा
विद्यार्थ्यांनंतर आता शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा डाव:राजू शेट्टींनी पोस्ट करत दिली स्वतःला ताब्यात घेतल्याची माहिती
