Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    NTA मध्ये केंद्राच्या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती:2 संचालक, एक सहसंचालक; तीन आठवड्यांत पदभार स्वीकारण्याचे आदेश

    August 28, 2026

    मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेला कल्याणचा तरुण बेपत्ता:'आमच्या मुलाला शोधून द्या', अभिषेकच्या कुटुंबीयांचा आक्रोश

    August 28, 2026

    कंगनाच्या जुन्या राखी जाहिरातीवर कुनिक्का सदानंद यांचा टोमणा:कृती सेननच्या ज्या कपड्यांवर आक्षेप घेतला, स्वतः तसेच कपडे परिधान केले होते

    August 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      Trump Renames Lake Ontario to Lake America; US-Canada Border Controversy

      August 28, 2026

      पाकची इम्रानच्या मुलांची मुलाखत रोखण्याची धमकी:तरीही स्काय स्पोर्ट्सने 18 मिनिटांची दाखवली मुलाखत, वॉकआउटची धमकी निष्प्रभ

      August 28, 2026

      रेडिओ बिघाडामुळे ट्रम्प यांचे हेलिकॉप्टर प्लेनजवळ पोहोचले:एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना 1 आठवडा आधीपासून ही समस्या माहिती होती; तरीही चूक

      August 28, 2026

      Nepal Tibet Border Flood; Missing Indians Rescue Operation Updates

      August 28, 2026

      खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

      August 28, 2026

      ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण

      August 28, 2026

      असदोद्दीन ओवेसी सुद्धा या निर्णयाच्या विरोधात  – VastavNEWSLive.com

      August 28, 2026

      बंगळुरूच्या NLSIU चा दीक्षांत सोहळा रद्द! – VastavNEWSLive.com

      August 28, 2026

      मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेला कल्याणचा तरुण बेपत्ता:'आमच्या मुलाला शोधून द्या', अभिषेकच्या कुटुंबीयांचा आक्रोश

      August 28, 2026

      Kaustubh Gavde Announced as TDF Candidate for Pune Teacher Constituency 2026

      August 28, 2026

      Prasad Lad Admits GR Errors; Manoj Jarange Demands To Be Met By CM

      August 28, 2026

      तुमचे काका मुख्यमंत्री असताना कारवाई का नाही केली?:मनसेच्या इशाऱ्यावर आशिष शेलारांचा पलटवार

      August 28, 2026

      NTA मध्ये केंद्राच्या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती:2 संचालक, एक सहसंचालक; तीन आठवड्यांत पदभार स्वीकारण्याचे आदेश

      August 28, 2026

      Ludhiana Spy Arrested | Pakistan ISI CCTV Live Feed Espionage Case latest update

      August 28, 2026

      मोदी चालीसाचे पठण करणारे किन्नर कल्याण मंडळ बरखास्त:पंतप्रधानांना राम म्हणून आरती केली होती; पाटण्यात मोदींच्या मंदिरासाठी परवानगी मागितली होती

      August 28, 2026

      Pakistan Spy Operation on India S-400

      August 28, 2026

      कंगनाच्या जुन्या राखी जाहिरातीवर कुनिक्का सदानंद यांचा टोमणा:कृती सेननच्या ज्या कपड्यांवर आक्षेप घेतला, स्वतः तसेच कपडे परिधान केले होते

      August 28, 2026

      रक्षाबंधननिमित्त रामदेव यांनी कंगनाला मिठाई-पैसे पाठवले:म्हटले- वाद संपवा; अभिनेत्री म्हणाली- सणाच्या दिवशी भूल-चूक माफ, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

      August 28, 2026

      टॉक्सिक अभिनेत्री रुक्मिणीच्या वडिलांना मिळाले होते अशोक चक्र:कर्नल वसंत वेणुगोपाल उरीमध्ये आठ दहशतवाद्यांशी लढले होते, कुटुंबाने सेवा परंपरा सुरू ठेवली

      August 28, 2026

      दिशा सालियान मृत्यू प्रकरण, कोर्टाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला:पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे- 12व्या मजल्यावरून पडूनही फक्त दातच कसे फ्रॅक्चर?

      August 28, 2026

      NTA मध्ये केंद्राच्या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती:2 संचालक, एक सहसंचालक; तीन आठवड्यांत पदभार स्वीकारण्याचे आदेश

      August 28, 2026

      मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेला कल्याणचा तरुण बेपत्ता:'आमच्या मुलाला शोधून द्या', अभिषेकच्या कुटुंबीयांचा आक्रोश

      August 28, 2026

      कंगनाच्या जुन्या राखी जाहिरातीवर कुनिक्का सदानंद यांचा टोमणा:कृती सेननच्या ज्या कपड्यांवर आक्षेप घेतला, स्वतः तसेच कपडे परिधान केले होते

      August 28, 2026

      खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

      August 28, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»NANDED»खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?
    NANDED

    खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

    adminBy adminAugust 28, 2026No Comments6 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    १२ तासांची ड्युटी, अपुऱ्या सुट्ट्या, कौटुंबिक संघर्ष आणि वरिष्ठांचा दबाव; समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी कोणाची?

    नांदेड (प्रतिनिधी) – समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभा असलेला पोलिस आपल्याला नेहमी खाकी वर्दीत दिसतो. त्याच्या हातात कायद्याची ताकद असते; चेहऱ्यावर कर्तव्याची कठोरता असते. मात्र त्या वर्दीच्या आत धडधडणारे हृदय, कुटुंबाची ओढ, शरीराचा थकवा आणि मनावर साचणारा ताण अनेकदा कुणाच्याच नजरेत येत नाही. पोलिसांचे कामाचे तास, रजा, कौटुंबिक जीवन, अंतर्गत संघर्ष आणि वरिष्ठ-कनिष्ठ संबंध यांचा विचार केला तर पोलिस दलासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांची गंभीरता लक्षात येते.

    सुट्ट्यांच्या कागदावरून वास्तवाच्या रस्त्यावर

    वृत्तांतातील आकडेवारीनुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षभरातील विविध सुट्ट्या आणि रजा मिळून सुमारे १६० दिवसांचा विश्रांतीचा कालावधी उपलब्ध होतो. रविवार, शनिवार, सणांच्या सुट्ट्या, आजारी रजा, किरकोळ रजा आणि अर्जित रजा यांचा त्यात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. २० दिवस किरकोळ आणि १५ दिवस अर्जित रजा मिळत असतात. साप्ताहिक सुट्टी अनेकदा  कागदावर असली तरी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती, बंदोबस्त किंवा अन्य तातडीच्या कामांमुळे ती प्रत्यक्षात मिळेलच, असे नाही. ही केवळ सुट्टीची बाब नाही. हा पोलिसांच्या विश्रांतीच्या अधिकाराचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे.

    १२ तासांची ड्युटी : शरीर थकते, मनही थकते

    वृत्तांतानुसार इतर शासकीय कर्मचारी वर्षातील सुमारे २०५ दिवस, दररोज आठ तास काम करतात. म्हणजे त्यांचे वार्षिक कामाचे तास सुमारे १,६४० होतात. पोलिसांच्या बाबतीत मात्र सुमारे ३०६ दिवस काम आणि दररोज किमान १२ तास कर्तव्य असा उल्लेख आहे.

    गणित सोपे आहे 

    ३०६ दिवस × १२ तास = ३,६७२ तास. म्हणजेच या तुलनेनुसार पोलिसांचे वार्षिक कामाचे तास इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत दुप्पटपेक्षा अधिक आहेत. याचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही. पुरेशी झोप न मिळणे, व्यायामासाठी वेळ नसणे, कुटुंबासाठी वेळ कमी होणे आणि सततच्या तणावपूर्ण वातावरणात काम करणे याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो.

    ड्युटी संपते; पण पोलिसांचा ताण संपतो का?

    पोलिसांच्या समस्या केवळ ड्युटीच्या वेळेत मर्यादित राहत नाहीत. त्या घरापर्यंत पोहोचतात. पोलिस दलातील २६ टक्के गृहकलहाचा अडकलेले असतात.  सणासुदीला घरात नसणे, मुलांना वेळ न देणे, अनियमित ड्युटी आणि सततचा मानसिक दबाव यामुळे कौटुंबिक संबंधांवर ताण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातच पोलिस दलातील अंतर्गत स्पर्धा आणि एकमेकांविरोधातील तक्रारी किंवा लावालावी हा आणखी एक तणावाचा मुद्दा आहे.

    कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक तक्रारीकडे संशयाने पाहण्याऐवजी वरिष्ठांनी तथ्य तपासून, दोन्ही बाजू ऐकून आणि निष्पक्षपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला कुणी समजून घेत नाही ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनात अधिक खोलवर जाऊ शकते.

    वरिष्ठांचा दबाव आणि कनिष्ठांची कोंडी

    पोलिस दलातील वरिष्ठ-कनिष्ठ संबंध हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. आदेशांची साखळी आवश्यक असली तरी त्यासोबत संवाद आणि मानवी दृष्टिकोनही आवश्यक आहे.पोलिस कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रमाणाबाबत अनुक्रमे १२ टक्के आणि ६ टक्के असे आकडे आहेत.

    वरिष्ठांकडून कनिष्ठांवर येणारा कामाचा दबाव, सततची जबाबदारी आणि चुका झाल्यास होणारी कारवाई यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीत काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीचा विचार करतात.शिस्त आवश्यक आहे; पण शिस्त आणि मानसिक दडपण यात फरक आहे.

    निरा गावचा धडा : पोलिसांचा धाक नव्हे, विश्वास जिंकला पाहिजे

    पोलिस दलाचे केवळ नकारात्मक चित्र पाहणे योग्य ठरणार नाही. बारामती तालुक्यातील निरा गावातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा ३६ वर्षांच्या सेवाकाळाचा प्रेरणादायी आहे. आंदोलने, मोर्चे, बंद किंवा धार्मिक वाद अशा परिस्थितीत त्यांनी संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परिणामी, पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले. त्यांची बदली होण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनीच बदली रद्द करण्यासाठी आंदोलन केली आज ते पोलीस अंमलदार सहायक पोलीस उप निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, पोलिसांचा धाक निर्माण करणे सोपे आहे; पण पोलिसांवर विश्वास ठेवणारा समाज निर्माण करणे ही खरी कामगिरी आहे. निरा गावात कोणत्याही जाती किंवा धर्माच्या कुटुंबात लग्न किंवा इतर कोणतेही मंगल कार्य असेल, तर त्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेषक म्हणून सर्वात पहिले नाव या लाडक्या पोलिसाचे असायचे.

    आपत्तीच्या काळात खाकी ठरते देवदूत

    पूर किंवा अन्य आपत्तीच्या काळात पोलिसांची मानवी बाजू अधिक ठळकपणे समोर येते. स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवणारे पोलिस, संकटाच्या वेळी जनतेसाठी आधार बनतात. त्या क्षणी नागरिक आणि पोलिस यांच्यातील नाते कायदा अंमलबजावणी करणारा आणि नागरिक एवढेच राहत नाही. ते माणूस आणि माणूस असे नाते बनते. समाजाकडून मिळणारा हा विश्वास आणि सन्मान पोलिसांसाठी मोठी मानसिक ऊर्जा ठरू शकतो.

    बदलाची सुरुवात कुठून होणार?

    पोलिस दलातील ताणतणाव कमी करण्यासाठी केवळ पोलिसांनी आत्मपरीक्षण करणे पुरेसे नाही. प्रशासनालाही आत्मपरीक्षण करावे लागेल. पोलिसांचे कामाचे तास शक्य तितके शिफ्ट पद्धतीने नियंत्रित करणे, नियोजित साप्ताहिक विश्रांती आणि रजा प्रत्यक्षात उपलब्ध करून देणे, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनाची सुविधा निर्माण करणे आणि वरिष्ठ-कनिष्ठ संवाद मजबूत करणे ही काळाची गरज आहे. पोलिस ठाणे हे केवळ गुन्ह्यांच्या नोंदीचे ठिकाण नसून ते सतत तणाव हाताळणारे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे तेथील वातावरणही संवेदनशील, सहकार्याचे आणि विश्वासाचे असणे आवश्यक आहे. त्याचवेळी पोलिस कर्मचाऱ्यांनीही आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नकारात्मक परिस्थितीला सकारात्मकतेने उत्तर देण्याऐवजी संयम, संवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे.

    आता प्रश्न पोलिसांचा नाही; प्रश्न संपूर्ण व्यवस्थेचा आहे!

    आपण पोलिसांकडून २४ तास कर्तव्याची अपेक्षा करतो. निवडणूक असो, मोर्चा असो, सण असो, पूर असो किंवा कायदा-सुव्यवस्थेचे संकट सर्वप्रथम धावून जाणाऱ्यांमध्ये पोलिस असतात. पण ज्यांच्याकडून समाजाच्या सुरक्षेची अपेक्षा केली जाते, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? खाकी वर्दी लोखंडाची नसते. त्या वर्दीच्या आतही एक माणूस असतो. (काही काही पोलीस लोखंडी पुरुष मात्र असतात ) त्याला थकवा येतो. त्याला घराची आठवण येते. त्याला मुलांसोबत वेळ घालवायचा असतो. त्यालाही सन्मानाने आणि मानसिक समाधानाने जगायचे असते. म्हणूनच पोलिसांच्या ताणतणावाचा प्रश्न हा केवळ पोलिस प्रशासनाचा विषय नाही; तो समाजाच्या सुरक्षिततेशी थेट जोडलेला प्रश्न आहे.

    खाकीला फक्त आदेश नकोत; आधारही हवा.

    पोलिसांना फक्त कर्तव्याची आठवण करून देण्याऐवजी त्यांच्या हक्कांचीही जाणीव ठेवावी लागेल. कारण.ज्यांच्या खांद्यावर समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांच्या खांद्यावरील ताण कमी करण्याची जबाबदारीही समाज आणि प्रशासनाचीच आहे. आणि कदाचित खाकी वर्दीला सलाम करण्याची खरी सुरुवात तेव्हाच होईल, जेव्हा आपण त्या वर्दीच्या आत उभ्या असलेल्या माणसालाही समजून घेऊ.

    पोलीस विरुद्ध इतर शासकीय कर्मचारी: कामाचे तास आणि सुट्ट्यांचे तुलनात्मक कोष्टक

    सुट्ट्या आणि कामाचा तपशील

    इतर शासकीय कर्मचारी

    पोलीस कर्मचारी

    रविवारच्या सुट्ट्या

    ५२ दिवस (निश्चित मिळतात)

    ५२ दिवस (कागदावर आहेत, पण मिळतीलच याची खात्री नाही)

    शनिवारच्या सुट्ट्या (दुसरा व चौथा)

    २६ दिवस

    सुट्टी मिळत नाही

    सण व उत्सवांच्या सुट्ट्या

    २४ दिवस

    सुट्टी नाही (उलट सणांच्या काळात बंदोबस्ताचे अतिरिक्त काम असते)

    आजारी रजा

    २० दिवस

    आजारी रजेवर गेल्यास वेतन मिळत नाही

    किरकोळ रजा (CL)

    २० दिवस

    २० दिवस

    मोठी किंवा अर्जित रजा (EL)

    ३० दिवस

    १५ दिवस

    संप, बंद, आपत्ती काळातील अतिरिक्त सुट्ट्या

    ५ ते ७ दिवस

    सुट्टी नाही (या काळात २४ तास कार्यरत राहावे लागते)

    एकूण सुट्ट्यांचे दिवस

    १६० दिवस

    अत्यंत कमी आणि अनिश्चित

    वर्षभरातील प्रत्यक्ष कामाचे दिवस

    २०५ दिवस

    ३०६ दिवस

    रोजचे कामाचे तास

    ८ तास

    किमान १२ तास

    वर्षातील एकूण कामाचे तास

    १,६४० तास

    ३,६७२ तास

    कामाच्या तासांमधील तफावत

    पायाभूत प्रमाण

    इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तब्बल २२४% जास्त काम

    शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम

    व्यायाम आणि आरोग्यासाठी पुरेसा वेळ मिळतो

    सततच्या १२ तास कामामुळे व्यायाम आणि स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही

    प्रवासाचा ताण आणि सुरक्षितता

    कामाचे तास निश्चित असल्याने प्रवासाचा ताण कमी असतो

    अत्यंत थकलेल्या अवस्थेत रोज १ तास स्वतःचे वाहन चालवून जावे लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous ArticleLudhiana Spy Arrested | Pakistan ISI CCTV Live Feed Espionage Case latest update
    Next Article कंगनाच्या जुन्या राखी जाहिरातीवर कुनिक्का सदानंद यांचा टोमणा:कृती सेननच्या ज्या कपड्यांवर आक्षेप घेतला, स्वतः तसेच कपडे परिधान केले होते
    admin
    • Website

    Related Posts

    ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; भावास लोखंडी रॉडने मारहाण

    August 28, 2026

    असदोद्दीन ओवेसी सुद्धा या निर्णयाच्या विरोधात  – VastavNEWSLive.com

    August 28, 2026

    बंगळुरूच्या NLSIU चा दीक्षांत सोहळा रद्द! – VastavNEWSLive.com

    August 28, 2026

    केवळ १० दिवसांत पूल उभा केला! अमेरिकेच्या दाव्यांची इराणने उडवली खिल्ली; वाचा बायत पूलचा रंजक वाद!

    August 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    NATIONAL

    NTA मध्ये केंद्राच्या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती:2 संचालक, एक सहसंचालक; तीन आठवड्यांत पदभार स्वीकारण्याचे आदेश

    By adminAugust 28, 20260

    केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये दोन संचालक आणि एक सहसंचालक नियुक्त केले आहेत.…

    मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला गेलेला कल्याणचा तरुण बेपत्ता:'आमच्या मुलाला शोधून द्या', अभिषेकच्या कुटुंबीयांचा आक्रोश

    August 28, 2026

    कंगनाच्या जुन्या राखी जाहिरातीवर कुनिक्का सदानंद यांचा टोमणा:कृती सेननच्या ज्या कपड्यांवर आक्षेप घेतला, स्वतः तसेच कपडे परिधान केले होते

    August 28, 2026

    खाकीच्या आतला माणूस थकतोय ! पोलिसांच्या ताणतणावाचे आत्मपरीक्षण कधी होणार?

    August 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Instagram

    Follow Me!

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login below or Register Now.

    Lost password?

    Register Now!

    Already registered? Login.

    A password will be e-mailed to you.