बस प्रवासादरम्याान 4 लाख 36 हजारांचे दागिणे चोरीला गेले
नांदेड(प्रतिनिधी) -बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचे 4 लाख 36 हजार 500 रुपयांच्या किंमतीचे दागिणे ठेवलेला प्लॅस्टीकचा डबा चोरीला गेल्याची घटना देगलूर ते मरखेल प्रवासादरम्यान घडली आहे.
मरखेल येथील महिला सौ.वैशाली राहुल रावसाहेब या 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.45 वाजता देगलूर येथून मरखेल जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करीत असतांना दुपारी 3.15 वाजेच्यासुमारास त्यांच्या लक्षात आले की, आपल्या जवळच्या बॅगमध्ये ठेवलेला प्लॅस्टीकचा डबा गायब आहे. त्यामध्ये 4 लाख 36 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे होते. मरखेल पोलीसांनी हा चोरीचा प्रकार गुन्हा क्रमांक 247/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक वळसे अधिक तपास करीत आहेत.
Post Views: 1