प्रेमप्रकरणातून वाद:प्रेयसीच्या चुलत्याची कुऱ्हाडीने‎ हत्या; प्रियकरासह चार अटकेत‎, नांदेड शहरातील आसना पूल परिसरात मध्यरात्री खून‎




नांदेड शहर पुन्हा एकदा थरारक हत्याकांडाने हादरले‎आहे. पुतणीच्या प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादाचा‎शेवट थेट खुनात झाला. सांगवीजवळील आसना पूल‎परिसरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत सचिन‎यशवंत काळे (२४, रा. नुरी चौक, नांदेड) या युवकाची‎विनादांड्याच्या कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या‎‎करण्यात आली. या प्रकरणातील‎‎मुख्य आरोपी राजेश दत्ता राजेगोरे‎‎याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना‎‎विमानतळ पोलिस आणि स्थानिक‎‎गुन्हे शाखेच्या पथकाने सहा तासांत‎‎ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्परतेचे‎‎दर्शन घडविले.‎ ‎पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎मृत सचिन काळे याची अल्पवयीन पुतणी आणि‎अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील राजेश दत्ता‎राजेगोरे (२२) यांच्यात प्रेमसंबंध होते. या दोघांनी काही‎महिन्यांपूर्वी घरातून पलायन केले होते. त्यानंतर भाग्यनगर‎पोलिस ठाण्यात युवती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात‎आली होती. मात्र युवतीने स्वतःहून पोलिस ठाण्यात‎हजर होऊन आपण स्वेच्छेने गेल्याचे सांगितले होते.‎समुपदेशनानंतर ती पुन्हा कुटुंबीयांकडे राहू लागली. या‎घटनेनंतर सचिन काळे आणि राजेश राजेगोरे यांच्यात‎सातत्याने वाद सुरू होता.दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री‎आरोपीने सचिन काळे याचा कुऱ्हाडीने खून‎केला.आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.‎ सहा तासांत ताब्यात‎ प्रेमप्रकरणावरून प्रेयसीच्या काकाचा‎कुऱ्हाडीचे घाव घालून खून‎करणाऱ्या मुख्य आरोपी राजेश दत्ता‎राजेगोरे याच्यासह त्याचे मित्र‎बालाजी राजेगोरे (२१), आत्माराम‎कदम (२०) आणि आणखी एक,‎अशा चौघांना विमानतळ पोलिस व‎स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी‎अवघ्या सहा तासांत ताब्यात घेतले.‎ बिनादांड्याच्या ‎कुऱ्हाडीने केले वार‎ प्रेमप्रकरणाचा सुरू असलेला वाद‎कायमचा मिटवण्यासाठी एकत्र‎आलेल्या आरोपी व त्याच्या मित्रांनी‎सचिन काळे याच्यावर कुऱ्हाडीने‎वार केले. ही कुऱ्हाड त्यांनी‎बिनदांड्याची आणली होती.‎खिशात लपवून आणलेली कुऱ्हाड‎हातात धरून त्यांनी सचिनच्या‎मानेवर, डोक्यावर, तोंडावर गंभीर‎वार केले. यात सचिनचा मृत्यू झाला.‎ महिनाभरापूर्वीच‎ दोघे गेले होते पळून‎ मृत काळे यांची अल्पवयीन पुतणी व‎आरोपी राजेश राजेगोरे यांच्यात प्रेम‎होते. यातून त्या दोघांनी जून २०२६‎मध्ये पलायन केले होते. या प्रकरणी‎भाग्यनगर पोलिस ठाण्यात युवती‎हरवल्याची नोंद करण्यात आली‎होती. मात्र अवघ्या २४ तासांतच ती‎परत आली होती. मी मामाच्या गावी‎गेले होते, असे तिने सांगितले होते.‎ प्रकरण मिटवण्यास‎ बोलवून केला घात‎ महिनाभरापासून आरोपी राजेश‎राजेगोरे आणि मृत सचिन काळे‎यांच्यामध्ये वाद सुरू होता. हे प्रकरण‎एकदाचे मिटवून टाकू. काय व्हायचं‎ते होऊ दे. असे म्हणून आरोपी राजेश‎राजेगोरे याने सचिन काळेला‎सांगवीजवळ असलेल्या आसना‎ब्रिज येथे बोलावले होते. याच‎ठिकाणी झालेल्या वादातून राजेशने‎मित्रांसोबत सचिनचा खून केला.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *