नांदेड-देगलूर रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू – VastavNEWSLive.com
नांदेड(प्रतिनिधी)- दुचाकीवर जाणाऱ्या एका युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. हा दुर्देवी घटनाक्रम हिप्परगा माळ शिवारातील रामतिर्थ रस्त्यावर आज सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास घडला आहे.
पोलीस मदत केंद्र देगलूर यांनी वाहतुक विभागाच्या अपर महासंचालकांना पाठविलेल्या माहितीनुसार आज सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ते राष्ट्रीय महामार्ग नरसी-देगलूर रस्त्यावर गेले. तेथे दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.व्ही. 7633 पडलेली होती. त्यावरील चालक राहुल आनंदा गोणारे रा.पोकर्णी पोस्ट उमरदरी ता.मुखेड जि.नांदेड याला कोणी तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा जिव गेला होता. रस्त्यावर झालेल्या गर्दीला बाजुला करून सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.डी.भिकाणे, पोलीस उपनिरिक्षक नारमोड, पोलीस अंमलदर बाबर, जाधव, सिध्दापुरे आणि वाजिद यांनी वाहतुकीस रस्ता मोकळा केला. या प्रकरणावरील पुढील कार्यवाही देगलूर पोलीस ठाणे करणार आहे. अद्याप त्याबद्दल काही माहिती मिळाली नाही.
Post Views: 5