नायगाव येथे मंदिरात चोरी
नायगाव तालुक्यातील विहूल रुक्मिणी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला. २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ते २४ फेब्रुवारी सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराच्या चॅनल गेटच्या आतील दरवाजाचे कडेकोडे व कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने मंदिरातील दागिने व दानपेटीतील रोकड असा एकूण ९६,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी लक्ष्मण आनंदराव पांचाळ (वय ६३, रा. रातोळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नायगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षकपोमनाळकर करीत आहेत.
भाग्यनगरमध्ये एटीएम मशिनसह साडेसात लाखांची रोकड लंपास
नांदेड शहरातील तरोडा बु. रोडवरील नागेश कॉम्प्लेक्स, राहुल कॉलनी येथील एस.बी.आय. बँकेच्या एटीएम रूममध्ये चोरट्याने प्रवेश करून एटीएम मशिनसह ७,७३,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० ते ३.१० या वेळेत घडली. चोरट्याने वापरातील एटीएम मशिन (किंमत १ लाख रु.) व त्यातील ६,७३,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ७,७३,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी कैलास चांदोबा कांबळे (वय ४४, रा. तथागतनगर, मालेगाव रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा दाखल असून तपास पोलीस उप निरीक्षक देशमुख करीत आहेत.
लोहा बसस्टँडवर साखळी चोरी
लोहा बसस्टँड येथे एका महिलेची सोन्याची साखळी चोरून नेल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. फिर्यादी स्वात्री गणेश शेळके (वय ३२, रा. सिडको नांदेड) यांच्या गळ्यातील ६०,००० रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पोलीस ठाणे लोहा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अंमलदार बालाजी लाडेकर करीत आहेत.
Post Views: 67
