Case registered against three people who were lured with the lure of getting a loan | व्यवसायिकाची 51 लाखांची फसवणूक: कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने लुबाडले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News



पुण्यात एका व्यावसायिकाची ५१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी बँक कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आदित्य मोहन रेळेकर (वय ३४, रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), करण विजय इजंतकर (वय ३२, रा. मेट्रो ग्रीन सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज-काेंढवा रस्ता) आणि श्रीनिवास पांडुरंग बकरे (वय ४७, रा. गुलाबनगर, धनकवडी, मूळ रा. देवाळी, ता. माणगाव, जि. रायगड) यांचा समावेश आहे. एका व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचे शुक्रवार पेठेत दुकान आहे. गेल्या वर्षी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची आर्थिक फसवणूक, कर्ज मंजुरी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या नावाखाली आरोपींनी व्यावसायिकाकडून वेळोवेळी ५१ लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक एन. व्हटकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मंदिरातून चांदीचा मुकुट चोरी

मंदिराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजारांचा चांदीचा मुकुट चाेरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात मांढरदेवी काळूबाई मंदिर आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजित बढे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *