Gyanganga Sanctuary Pench Tiger Release Melghat Wildlife Conservation | ‘ज्ञानगंगा’ अभयारण्यात वाघाची डरकाळी!: पेंचमधून आलेल्या नर वाघाचे यशस्वी स्थलांतर, पहिल्या चार तासातच केली शिकार – Buldhana News



बुलढाणा-खामगाव महामार्गालगत वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या वनवैभवात आज मोठी भर पडली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या ‘PKT7CP-1’ नावाच्या तीन वर्षीय नर वाघाला आज, रविवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अभयारण्यात मुक्त करण्यात आले. या नव्या पाहुण्या

.

या वाघाचा प्रवास रंजक आहे. 2023 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात हा वाघ अवघ्या चार महिन्यांचा असताना सापडला होता. त्यानंतर त्याचे संगोपन पेंच व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले. शनिवारी रात्री पेंचमधून विशेष वाहनाद्वारे सलग 15 तासांचा प्रवास करून या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आले.

पहिल्या 4 तासांतच केली शिकार

वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाघाला तूर्त अभयारण्यातील बोरखेड-देव्हारी परिसरातील एका विस्तारित जाळीच्या बंदिस्त क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नवीन वातावरणात आल्यानंतर अवघ्या चार तासांतच या वाघाने त्याच्यासाठी सोडलेल्या एका रेड्याची शिकार केली. यावरून हा वाघ येथील वातावरणाशी लवकरच जुळवून घेईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.

205 चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य साग आणि अंजन वृक्षांच्या हिरवाईने नटलेले आहे. येथे आधीच बिबट, अस्वल, तडस, नीलगाय आणि 150 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती वास्तव्यास आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *