BJP election office inaugurated by senior workers | भाजप निवडणूक कचेरीचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्घाटन: उमेदवारांकडून निस्वार्थ सेवेचा सन्मान करत प्रचाराचा शुभारंभ – Pune News



भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील निवडणूक कचेरीचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ क

.

यावेळी बोलताना उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले की, “निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून, संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची जबाबदारी उमेदवारांवर असते. पक्षाच्या यशामागे लाखो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट, त्याग आणि परिश्रम आहेत.”

याच भावनेतून प्रभाग २५ मधील ज्येष्ठ नगरसेविका मीरा पावगी, ज्योत्स्ना सरदेशपांडे, रमेश परचुरे आणि किरण सरदेशपांडे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यास कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ आणि श्रेयस लेले यांची उपस्थिती होती.

या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून महागड्या गाड्यांची चर्चा सुरू असताना, प्रभाग २५ मधील उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या नावावर असलेले एकमेव चारचाकी वाहन लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या नावावर केवळ एक रुग्णवाहिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *