Savitribai Phule’s work is paid tribute to at Mauli Gurukul | सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला माउली गुरुकुलात अभिवादन – Chhatrapati Sambhajinagar News
![]()
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निल्लोड फाटा येथील श्री माउली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय व संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम झाला. स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंच्या कार्याला या वेळी अभिवादन करण्यात आले.
.
अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज पवार होते. शारदाताई पवार, माजी विद्यार्थी व प्रिंटिंग व्यावसायिक प्रमोद कोलते, मुख्याध्यापक कृष्णा जैवाळ, व्यवस्थापक गजानन डिगावकर, सचिव पुरुषोत्तम महाराज पवार, वारकरी व्यवस्थापक संदीप महाराज काकडे, अकील शेख उपस्थित होते.
महिला शिक्षकांनी कार्तिक मालोदे या विद्यार्थ्याला सावित्रीमाईंच्या वेशात सादर केले. या उपक्रमाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लक्ष पाटील, अथर्व पवार, संग्राम भूतकर यांनी भाषणातून सावित्रीमाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला. रामेश्वर महाराज पवार म्हणाले, “सावित्रीमाईंनी शेण-गोट्यांचा मार सहन करत शिक्षणाची मशाल पेटवली. त्यामुळेच आज स्त्री प्रगतीच्या वाटेवर आहे.’ प्रमोद कोलते यांनीही भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन सुजाता बिऱ्हाडे यांनी केले. आभार मयूरी काकडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
