Film style kidnapping of the boyfriend of a girl who was arranged for marriage by her mother in Chhatrapati Sambhajinagar, incident at CIDCO bus stand | छत्रपती संभाजीनगरमध्ये आईकडून लग्न जुळलेल्या मुलीच्या प्रियकराचे फिल्मीस्टाइलने अपहरण: सिडको बसस्थानकातील घटना, रात्री उशिरा एका महिलेला अटक – Chhatrapati Sambhajinagar News



सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्ट्याच्या गाडीवर काम करणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणाचे शनिवारी (१३ डिसेंबर) दुपारी ३.१५ वाजता फिल्मीस्टाइलने अपहरण करण्यात आले. एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या महिलेसह १० ते १२ अज्ञातांनी तरुणाला बेदम मारहाण करून जबरदस

.

फिर्यादी सुरेश नरवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाचा विशाल येडके हा सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्टा सेंटरवर काम करतो. त्याचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी अचानक एक गाडी आली. त्यात त्याला टाकून घेऊन गेले. त्यानंतर ही घटना घडली.

अपहरणानंतर बेदम मारहाणीचा थरार अपहरणकर्त्यांनी विशाल येडकेला गाडीत कोंबून नेल्यावर काय घडले याची माहिती पीडित विशालने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत दिली आहे. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सिडको बसस्थानकातून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये विशालला कोंबण्यात आले. कारमधून सातारा परिसरात घेऊन जात असताना आरोपींनी विशालला बेदम मारहाण केली. साताऱ्यामध्ये पोहोचल्यावर आरोपींनी आणखी १० ते १२ जणांना बोलावून घेतले आणि त्या सर्वांनी मिळून विशालला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी विशालला सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली आणून सोडून दिले. तेथून विशालने मामाला फोन केला. त्यानंतर मामा नरवडे यांनी त्याला सोबत घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले आणि अपहरणाची तक्रार दाखल केली.

एक वर्षापूर्वीच्या घटनेतूनच सूड

या अपहरणामागे एक वर्षापूर्वी घडलेला प्रकार कारणीभूत ठरला आहे. एक वर्षापूर्वी विशाल आणि तरुणी हे दोघेही घरातून पळून गेले होते. तेव्हा विशालच्या मामाने (सुरेश नरवडे) मध्यस्थी करत दोघांनाही पोलिस ठाण्यात हजर केले होते. पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगितले आणि तरुणीला तिच्या आईच्या, म्हणजेच आरोपी महिलेच्या स्वाधीन केले होते. मात्र, या घटनेनंतरही आरोपींच्या मनात राग कायम होता. याच जुन्या रागातून मुलीच्या आईने सूड घेण्याच्या उद्देशाने शनिवारी आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन फिल्मीस्टाइलने विशालचे अपहरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *