![]()
काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथील सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक – 2026 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया, असे काँग्रेसने ही यादी जाहीर करताना आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. खालील फोटोंमध्ये पाहा काँग्रेसची यादी
काँग्रेसची BMC साठी 87 उमेदवारांची यादी जाहीर:सर्वधर्मीयांना संधी देत जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न; वाचा कुणाला मिळाली संधी?
