![]()
शिवसेनेचे माजी उपमहापौर आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आज दुपारी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगि
.
जंजाळ यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या जागावाटपात युती होणार की नाही, याबाबत कोणतीही निश्चिती नाही. भाजपसोबत जागावाटपाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच, शिवसेनेला अत्यंत कमी जागा मिळत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
या परिस्थितीमुळे आपण कालपासून जागावाटप प्रक्रियेतून बाजूला झालो आहोत, असे जंजाळ यांनी सांगितले. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
“आमच्या वाट्याला येणाऱ्या जागा अतिशय कमी आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या छातीवर बसून मला निवडणूक लढायची नाही,” असे जंजाळ म्हणाले. या कारणास्तव त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, इतक्या दिवसांपर्यंत मी युतीच्या जागावाटप प्रक्रियेत सहभागी होतो, मात्र कालपासून मी या प्रक्रियेत नाही. त्यामुळे आता नेमके काय सुरू आहे, याची माहिती मला किंवा खासदार संदिपान भुमरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही नाही.
