राज्याच्या राजकीय वर्तुळात शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच, माजी खासदार गजानन कीर्तिकर हे नाराज असून पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, गजानन कीर्तिकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत माध्यमांतील वृत्त निराधार आणि खोटे असल्याचे सांगितले. तसेच, यापुढे शिवसेना पक्षाला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गजानन किर्तीकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, मी शिवसेना पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांमुळे मला आश्चर्याचा धक्का बसला, पक्ष सोडण्याची माझी कोणतीही इच्छा नसून हे वृत्त निराधार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाधानाने मी काम करत आहे. शिवसेना शिंदे गट सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा इरादा नाही. एकनाथ शिंदे यांनी फोन करून विचारपूर केली, त्यांना मी वस्तुस्थिती सांगितली. शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास असून शिवसेना महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे, आता पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे किर्तीकर यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे महत्त्वाचे पुढे बोलताना गजानन किर्तीकर म्हणाले, आपल्याला कोणतीही ऑफर आलेली नाही, बातम्या देणाऱ्यांना खोडाळ म्हणणार नाही. मात्र, बातमी पाहुहण मला धक्का बसला. कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे महत्त्वाचे असल्याचे एकनाथ शिंदे यांना सांगितले. माजी खासदार म्हणून व्याधिग्रस्त आणि अन्यायग्रस्त लोकांची कामे करण्यासाठी संपर्क आवश्यक आहे. तातडीच्या कामांसाठी मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुखांशी संपर्क साधता आला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी संपर्कातील अडचण दूर करण्यासाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच महिन्यातून किमान एक बैठक घेण्याची मागणी केली आहे. एनडीएचा घटक म्हणून काम करताना पक्षासाठी वेळ द्यावा, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? इतकेच नव्हे तर गजानन किर्तीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली याचे देखील कारण सांगितले. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कॉंग्रेसधार्जिन होत होती आणि मराठी बाणा हरवत होता. म्हणून तो पक्ष सोडल्याचे किर्तीकर यांनी सांगितले. गजानन कीर्तिकरांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम एकनाथ शिंदे यांच्याशी भेट होत नसल्याने गजानन कीर्तिकर नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. तसेच, ते पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी भेट होत नसून, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने कीर्तिकर नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट करत आपण यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. दरम्यान, गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असून, ठाकरे गटाचे मुंबईतील नेते अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत.
‘शिवसेना सोडण्याचा इरादा नाही’:गजानन कीर्तिकरांनी चर्चांना लावला पूर्णविराम; म्हणाले- ‘पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार’