‘भीमथडी जत्रे’त चोरट्यांकडून हातसाफ: गर्दीचा फायदा घेत महिला बचत गटाच्या स्टॉलमधील 55 हजारांची रोकड लांबवली – Pune News

‘भीमथडी’ जत्रेतील एका स्टॉलमधून ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

.

याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या इंदापूरमधील बेलवडी-थोरातवाडी गावातील रहिवासी आहे. महिला आणि गावातील बचत गटातील महिलांनी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘भीमथडी’ जत्रेत खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला आहे. गुरुवारी (२५ डिसेंबर) नाताळची सुट्टी असल्याने ‘भीमथडी’ जत्रेत गर्दी झाली होती. खाद्यपदार्थ विक्रीतून जमा झालेली रोकड महिलेने स्टॉलमधील स्टिलच्या डब्यात ठेवली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास चोरट्यांनी स्टिलच्या डब्यात ठेवलेली ५५ हजारांची रोकड लांबविली. याबाबत सर्वत्र शोधा शोध करूनही पैसे मिळाले नाही, अखेर तक्रारदारांनी याबाबत पोलिसांकडे फिरत दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस जाधव पुढील तपास करत आहेत.

कंपनीतून १५ लाखांचे ॲल्युमिनियम साहित्य चोरी

पुणे शहरातील हडपसर भागातील एका खासगी कंपनीतून १५ लाखांचे ॲल्युमिनियम साहित्य चोरट्यांनी लांबविले.याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी परिसरात खासगी कंपनी आहे. चोरटे मध्यरात्री कंपनीच्या आवारात शिरले. चोरट्यांनी कंपनीच्या आवारात ठेवलेले ॲल्युमिनियम साहित्य चोरून नेल्याचे नुकतेच उघडकीस आले. पोलीस कर्मचारी एन मुंढे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks