Tight security in Hingoli district on the backdrop of Thirty-First | थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर हिंगोली जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त: शहरातील चौकांमधून वाहन तपासणी, 450 पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा उतरणार रस्त्यावर – Hingoli News
![]()
हिंगोली शहरासह जिल्हाभरात थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातील सर्वच चौकांमध्ये वाहनांचील तपासणी केली जाणार आहे. या शिवाय ५४ पोलिस अधिकारी, ४५० पोलिस कर्मचाऱ्यांचा तफा रस्त्यावर उतरणार आहे. त्यांच्या मदतीला गृह रक्ष
.
हिंगोली जिल्हयात थर्टीफर्स्टचे जल्लोषात स्वागत करण्याची नागरीकांकडून तयारी केली जात आहे. यावर्षी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने शाकाहरी भोजनासाठी मांसाहरी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हॉटेल्स, ढाब्यांवर विशेष पदार्थ तयार ठेवण्याची तयारीही चालवली असल्याचे चित्र आहे. तर तळीरामांचा उच्छाद वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, शहरासह जिल्हाभरात हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. कुठेही अनुचीत प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले हे अधिकारी देखील बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
जिल्हयातील मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. या शिवाय २६ ब्रिथॲनालायझरद्वारे वाहन चालका्ंची तपासणी होणार असून ध्वनी मर्यादेचे पालन होण्यासाठी २७ नाॅईल लेव्हल मिटर ठेवण्यात येणार आहेत. या शिवाय धार्मिकस्थळ, महापुरुषांच्या पुतळा परिसरात बंदोबस्त राहणार आहे.
जिल्हयात मद्य प्राशनकरून वाहन चालविणाऱ्यांवर तसेच कायदा व सु्व्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूुत्रांनी सांगितले. नागरीकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
