200 कोटींच्या रस्त्याला भेगा; "उबाठा'चे आंदोलन,:अकाेला-अकाेट मार्गाची दुरावस्था; आतापर्यंत 28 जणांचा गेला जीव‎




मृत्युच्या सापळ्यात अडकलेल्या अकोला-अकोट व देवरी फाटा-शेगाव या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने शेतकऱ्यांना सोबत घेत शनिवारी भरपावसातच रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यासाठी गत नऊ वर्षांत २०० कोटींचा खर्च झाल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. अद्यापही रस्ता अंदाजपत्रकानुसार झालेला नाही. तसेच या रोडवर २८ जणांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे हे काम तातडीने व्यवस्थित न झाल्यास अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. आता पुढील सोमवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एचएचएआय) अभियंते व लोकप्रतिनिधी यांची अकोल्यात संयुक्त बैठक होणार आहे. शिवसेना नेत्यांनी रोडचे काम कसे निकृष्ट झाले, याचा पाढाच वाचला. अकोला-अकोट तसेच देवरी फाटा-शेगाव या सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी आणि कडेला मोठ्या भेगा पडल्या आहे. सन २०१७ मध्ये सुरू झालेल्या या रस्त्याचे काम अद्यापही अंदाजपत्रकानुसार पूर्ण झालेले नाही. त्याकाळात १६५ कोटी रुपयांचे असलेले अंदाजपत्रक आता २०० कोटींपेक्षा जास्त झाले आहे. रस्ता व्यवस्थित न बांधल्याने वाहनांचे संतुलन बिघडून वारंवार भीषण दुर्घटना पडत आहेत. चोहोट्टा बाजार परिसरात मोटारसायकलचे चाक भेगेत अडकल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. { उर्वरित पान ४ आंदोलनस्थळी एनएचएआयचे उपअभियंता, शाखा अभियंता होते. याठिकाणी आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर या नेत्यांची कार्यकारी अभियंत्यांशी फोनवरुन संवाद साधला. अद्याप रस्ता पूर्ण झालेला नसतानाही देखभाल करण्याची वेळ का आली, असा सवाल नेत्यांनी केला. दोन्ही बाजूला झाडांची लागवड का नाही.तसेच अंदाजपत्रकानुसार काम न झाल्यास काळे फासणार आहोत. रस्ता पूर्ण झाला नसतानाही देखभालीची वेळ का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *