महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी रोहित्रावरच होरपळला:विजेच्या धक्क्याने 33 वर्षीय महादेव पोहकर यांचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र

[ads1]


सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे रोहित्रावर कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 21 सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. काम सुरु असतांनाच विज पुरवठा सुरु झाल्याने हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद करून ठेवले आहेत. याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने ज्यांच्याकडे सिंचनासाठी पाणी आहे त्या शेतकऱ्यांकडून विद्युतपंप सुरु करून पिकांना पाणी देऊन पिके वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार पार्डी पोहकर येथील शेतकरी महादेव पोहकर (33) यांनी देखील त्यांच्या आठ एकर शेतात पिक भिजविण्याचे काम सुरु केले होते. दरम्यान, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारा ते शेतात गेल्यानंतर विद्युतपंप सुरु होत नव्हता. त्यामुळे त्यांनी रोहित्रावर पाहणी केली असता त्या ठिकाणी वायर तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी पुसेगाव येथील उपकेंद्रात मोबाईलवरून संपर्क साधून वायर जोडणी होईपर्यंत विज पुरवठा खंडीत करण्याची विनंती केली. त्यानुसार पार्डी पोहकर भागाचा विज पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर शेतकरी महादेव हे काम करण्यासाठी रोहित्रावर चढले होते. यावेळी एकाबाजूचे वायर जोडल्यानंतर दुसऱ्या बाजुचे वायर जोडत असतांना अचानक विज पुरवठा सुरु झाला. त्यामुळे महादेव हे रोहित्राच्या वायरलाच चिटकून बसले अन त्यातच गंभीररित्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकार इतर शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुसेगाव येथील विज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. दरम्यान सकाळी साडेदहा वाजेपर्यंत महादेव यांचा मृतदेह रोहित्रावर लटकलेल्या अवस्थेत होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *