Pune RPI Athawale Gets $9$ Seats BJP Alliance BMC | पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 9 जागा: भाजपसोबतच्या युतीत महानगरपालिका निवडणुकीसाठी वाटप – Pune News



पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांची युती असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा मिळाल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली आहे.

.

प्रभाग क्रमांक १ मध्ये राहुल भंडारे, प्रभाग २ अ – रेणुका चलवादी, प्रभाग २ ब – सुधीर वाघमारे, प्रभाग ६ संतोष आरडे, प्रभाग ७ निशा मानवदकर, प्रभाग ८ परशुराम वाडेकर, प्रभाग १३ निलेश आल्हाट, प्रभाग १४ हिमाली कांबळे आणि प्रभाग २२ मधून बापू कांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्या नेतृत्वात निवडणुकीला उमेदवार सामोरे जाणार आहे.

पुढे त्यांनी सांगितले आहे की, भाजपकडे आम्ही १५ जागांची मागणी केली होती, वाटाघाटी मध्ये भाजपाने आम्हाला ९ जागा दिल्या आहेत. यामध्ये ६ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश असून सामजिक संतुलन राखण्यात आले आहे, आरपीआयच्या उमेदवारांमध्ये ५ बौद्ध, ३ मातंग आणि एक धनगर उमेदवार आहे. मागील निवडणुकीत देखील भाजप आणि आरपीआय यांची मनपा युती होती त्याचप्रमाणे आता सुद्धा आम्ही युती म्हणून महापालिका निवडणुका लढवणार असून पुणे महापालिकेवर भाजप – आरपीआयची सत्ता येईल असा विश्वास शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप, महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks