Preservation and conservation of plants is the need of the hour, asserts Deputy Chief Executive Officer Fadol | रोपांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज: उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडोळ यांचे प्रतिपादन‎ – Nashik News



“पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेल्या रोपांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,”असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी केले. तालुक्यातील खडक सुकेणे येथे वृक्षारोपण कार्यक्र

.

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वर्षा फडोळ यांच्या हस्ते विविध फळझाडे आणि सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. मार्गदर्शन करताना फडोळ म्हणाल्या, प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी किमान एक झाड लावून ते जगवले पाहिजे. वृक्षारोपण ही केवळ एक शासकीय मोहीम नसून ती लोकचळवळ झाली पाहिजे,असे त्या म्हणाल्या. यावेळी शंभर झाडांची लागवड करत गावातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांना झाडे दत्तक देण्यात आली. यावेळी सरपंच रंजना गुंबाडे, उपसरपंच मधुकर फुकट, ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *