![]()
पुणे शहरात ब्राह्मण मतदारांची संख्या सुमारे १६ ते १८ टक्के असूनही, राजकीय पक्षांकडून ब्राह्मण उमेदवारांना अनेकदा डावलले जाते, अशी भावना सकल ब्राह्मण समाजाने व्यक्त केली आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजाला योग्य आणि पुरेसे प्रतिनिध
.
यावेळी समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, सह-समन्वयक अॅड. ईशानी जोशी, प्रवक्ते विश्वजीत देशपांडे, राजकीय समितीचे सदस्य विश्वनाथ भालेराव, मंदार रेडे आणि सुनिल पारखी आदी पदाधिकारी उपस्थित होते. ब्राह्मण बहुल प्रभागांमध्ये ब्राह्मण उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे आणि आरक्षित समाजातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सुमारे ५० ब्राह्मण कार्यकर्ते निवडून आले आहेत. एकट्या मराठवाड्यात ५ ठिकाणी ब्राह्मण नगराध्यक्ष निवडून आले आहेत. कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने ब्राह्मण उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही ब्राह्मण समाजातील अनेक चांगल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्रातील विविध २९ महापालिकांच्या निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या मागणीसंदर्भात सकल ब्राह्मण समाजाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन आणि सुमारे ३० उमेदवारांची यादी दिली आहे. यावर सकारात्मक विचार होईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनाही आवाहन करण्यात आले आहे. लवकरच काँग्रेस पक्षाच्या पुणे येथील नेत्यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
